खारघर टोलनाका ते कळंबोली मॅकडोनाल्ड पर्यंत होणारी वाहतूक कोंडी न थांबल्यास मनसे  करणार तीव्र आंदोलन.

0

उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )

खारघर टोल नाका ते कळंबोली मॅकडोनाल्ड या परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून वाहतूक कोंडी मुळे नागरिकांना अनेक विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. वाहतूक कोंडीवर त्वरित मार्ग निघावा अशी जनतेतून मागणी होऊ लागली आहे. मनसेने या जनतेच्या समस्या लक्षात घेउन खारघर टोल नाका ते कळंबोली मॅकडोनाल्ड येथे होणाऱ्या वाहतुक कोंडी संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल धोटे व पोलीस निरीक्षक कळंबोली वाहतुक विभाग बानकर यांची भेट घेतली. व मनसे तर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. येत्या ८ दिवसात कारवाई झाली नाही तर मनसे तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष  संदेश ठाकूर यांनी दिला.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेचे सरचिटणीस  आरिफभाई शेख, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस  प्रणव कारखानीस, रायगड जिल्हा सचिव अतुल चव्हाण , पनवेल महानगर उपाध्यक्ष कळंबोली  अमोल बोचरे, पनवेल महानगर उपाध्यक्ष खारघर  गणेश बनकर, पनवेल महानगर उपाध्यक्ष संजय मुरकुटे, पनवेल महानगर सचिव  राहुल चव्हाण, वाहतुक सेना उपाध्यक्ष  भगवान खताळ, सुजित सोनवणे, सहकार सेना कळंबोली शहर अध्यक्ष विवेक बोराडे, पनवेल विधानसभा अ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here