खोपटे ते कोप्रोली व दिघोडे ते दास्तान मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मनसे व काँग्रेस पक्षाची मागणी

0

मनसे व काँग्रेस तर्फे वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना देण्यात आले निवेदन.

उरण दि 14(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील खोपटे कोप्रोली रोड वर सातत्याने मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहनांची ये जा होत असते. सदर रोड वर असणाऱ्या सी. एफ. एस. व एम टी यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहने ये जा करत असतात. त्यामुळे रोजच वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागतो. खोपटे कोप्रोली 2 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी कधी कधी दोन तास वाया जातात. त्यामुळे या समस्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे.येत्या 19 तारखेपासून गणपती उत्सव सुरु होत आहे. सदर उत्सवाच्या काळामध्ये सामान्य जनतेला रोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्ये पासून वाचवण्यासाठी येणाऱ्या 15 तारखेपासून पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये अवजड वाहनांना सदर रस्त्यावर ये जा करण्यास बंदी घालून वरील समस्याचे निराकरण अशी मागणी यावेळी काँग्रेस पक्ष व मनसे पक्षाच्या वतीने वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना करण्यात आले. या मागणीचे निवेदन सुद्धा पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना देण्यात आले.यावेळी संदेश ठाकूर रायगड जिल्हाध्यक्ष मनसे,सत्यवान भगत तालुका अध्यक्ष मनसे,विनोद म्हात्रे तालुका अध्यक्ष काँग्रेस,अल्पेश कडू तालुका चिटणीस तथा वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष,मंगेश वाजेकर उपतालुका अध्यक्ष मनसे,राकेश भोईर उपतालुका अध्यक्ष मनसे,बबन ठाकूर विभाग अध्यक्ष मनसे,श्रीरंग म्हात्रे उपविभाग अध्यक्ष मनसे आदी मान्यवर उपस्थित होते.

भेंडखळ ते कोप्रोली मार्गांवर व दिघोडा ते दास्तान फाटा मार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्यांचे लवकर निरसन करण्यात यावे.अन्यथा गणपती च्या काळा फार मोठी वाहतूक कोंडी होईल.याकडे लक्ष न दिल्यास दोन्ही मार्गांवर मनसे व काँग्रेसच्या माध्यमावर लोकहितासाठी संयुक्त विद्यमाने लवकरच अंदोलन करण्यात येईल.

संदेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष मनसे.

भेंडखळ ते कोप्रोली मार्गांवर व दिघोडा ते दास्तान फाटा मार्गांवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका गणेशोत्सव मध्ये भाविक भक्तांना बसणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने या महत्वाच्या समस्याची दखल घेउन त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात.

विनोद म्हात्रे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस.

लवकरच सदर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गणेशोत्सव काळात व त्यानंतर भाविक भक्तांना वाहतूक कोंडीच्या समस्याला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेउ. सदर समस्या मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा कळविली आहे.

संजय पवार, पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक विभाग,उरण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here