पैठण – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील तीव्र संघर्ष आपल्याला १९३२ पर्यंतच दिसतो. त्यानंतर गांधी बाबासाहेबांना समजून घेऊ लागले. या दोघांच्याही करूणेमुळं भारत हा देश घडू शकला’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी केले. ते प्रतिष्ठान महाविद्यालयात आयोजित विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवानंद सोनकांबळे हे होते.
1916 पासूनच गांधी – आंबेडकर राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार करत होते. बाबासाहेब आंबेडकरांची भूमीका थोडी अधिक व्यापक होती. बाबासाहेबांच्या चळवळीत स्त्रियांचा सहभाग अधिक प्रमाणात होता. हे लक्षात घेऊन गांधीजींनी स्त्री आणि पुरूष या सामान्य माणसाचा सहभाग स्वातंत्र्य लढ्यात वाढविला.
सात प्रमुख धर्म, 25 संप्रदाय, आठ हजार भाषा, आठ हजार जाती असा आवाढव्य देश बांधून ठेवायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समिती आणि घटना मसुदा समितीत घेण्याशिवाय पर्याय नाही असा गांधीजींचा आग्रह होता असं सांगून डॉक्टर कांबळे पुढे म्हणाले की, बाबासाहेब असो की गांधीजी असोत हे अभिनिवेशाने समजून घेता येत नाहीत.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर मनीषा काळे यांनी केले.कार्यक्रमाचे संचलन डॉ.अर्जून मोरे तर आभार डॉ. हंसराज जाधव यांनी मानले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रकाश तुरुकुमाने प्राध्यापक वैजनाथ चाटे, डॉक्टर रमाकांत तिडके यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.ममताराम करे ,डॉ. सुवर्णा पाटील,डॉ. माजिद शेख,डॉ. प्रभाकर कुटे, प्राध्यापक रविचंद्र आंधोरीकर, प्राध्यापक सुधीर नलभे, तडवी, बागुल, रुपेकर, हिवराळे आणि एनसीसी कॅडेट यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.