ग्रामपंचायत पाणजे येथे कम्युनिटी सेंटर हॉलचे भूमीपूजन व जनरेटरचे उदघाटन उत्साहात संपन्न.

0

उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )

पाणजे गावात कम्युनिटी हॉलची आवश्यकता होती.कम्युनिटी हॉलची गरज लक्षात घेउन गावात कम्युनिटी हॉल बांधण्याचा संकल्प सरपंच लखपती पाटील यांनी केला त्या नुसार पाणजे गावात कम्युनिटी सेंटर हॉल बांधण्यात येणार असून त्याचे पायाभरणीचे भूमीपूजण सरपंच लखपती पाटील यांच्या हस्ते झाले.सिडकोच्या योजने अंतर्गत हे कम्युनिटी  हॉल बनत असून कम्युनिटी सेंटर हॉल साठी इंदरदीप कन्सट्रकशन कंपनीचे महत्वाचे योगदान लाभत आहे.यासाठी डॉ मनिष पाटील यांनी विशेष पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन डॉ मनिष पाटील यांनी दिले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उरण तालुक्यातील पाणजे गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती.27 दिवसातून एकदा ग्रामस्थांना पियाला पाणी मिळायचे अशी गावात परिस्थिती होती. तसेच जर कधी कधी अचानक वीज गेल्याने ग्रामस्थांना पाणीच मिळत नसे.ही समस्या विद्यमान सरपंच लखपती पाटील यांच्या लक्षात येताच गावात वारंवार जाणारी वीज व त्यामुळे उदभवणाऱ्या समस्या लक्षात घेउन सरपंच लखपती पाटील यांनी गावात एक सुसज्ज अत्याधुनिक असे जनरेटर आणण्याचा संकल्प केला व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. गावासाठी विजेचे जनरेटर मिळावे यासाठी सरपंच लखपती पाटील यांनी गुडरीच मेरिटाईम प्रा. लि.कंपनीच्या प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. गावच्या समस्या लक्षात घेत गुडरीच कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कंपनीचा सीएसआर फंड पाणजे गावातील जनरेटरसाठी दिला. जवळ जवळ 4 लाख 80 हजार रुपये पर्यंत किंमत असलेले जनरेटर गुडरीच कंपनीने पाणजे गावाला भेट दिला. गुडरीच मेरिटाईम प्रा. लि.कंपनीचे मॅनेजर प्रसन्न रामण यांनी यासाठी विशेष योगदान केले. प्रसन्ना रामण यांच्या विशेष प्रयत्नाने पाणजे गावाला जनरेटर मिळाला. या जनरेटरचे उदघाटन गुडरीच मेरिटाईम प्रा. लि.कंपनीचे मॅनेजर प्रसन्ना रामण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत आणि ग्राम सुधारणा मंडळ पाणजे यांच्या वतीने मॅनेजर प्रसन्ना रामण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.जेंव्हा जेंव्हा वीज जात होती तेंव्हा तेंव्हा पाईपलाईन द्वारे मिळणारे पिण्याचे पाणी पाणजे गावाला मिळत नव्हते. मात्र समस्त पाणजे ग्रामस्थांची ही समस्या आता मिटली असून जनरेटर मुळे आता वीज  खंडीत झाली असता देखिल जनरेटर च्या साह्याने पाणी पुरवठा करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी गुडरीच मेरिटाईम प्रा. लि. कंपनीचे व सरपंच लखपती पाटील व उपसरपंच विलास पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य  यांचे आभार मानले. व या कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले.या उदघाटन प्रसंगी  सरपंच लखपती हसुराम पाटील, उपसरपंच विलास पाटील, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष हेमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य करिष्मा पाटील, प्राची पाटील, हितेश भोईर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावचे मनोगत  लखपती पाटील आणि  हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here