पैठण,दिं.९ : श्री क्षेत्र पैठण येथे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या ४२५ व्या षष्ठी उत्सवाला नाथांच्या वाड्यातील पवित्र रांजनात गोदावरी नदीचे जल भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
श्री संत एकनाथ महाराज जलसमाधी उत्सवाच्या निमित्ताने फाल्गुन वद्य व्दितीया अर्थात श्री तुकाराम बीज पासून सुरुवात होते.आज पासून नाथांच्या वाड्यातील जो रांजण प्रत्यक्ष भगवंत श्रींखडयाच्या रूपा मध्ये दररोज भरत होता तो रांजन गुरूवार (दिं.९) मार्च पासून सुरुवात झाली.
दुपारी ठिक बारा वाजता नाथांच्या राहत्या वाड्यात (गावातील नाथमंदीर)येथे सर्व ब्रम्हवृंद ,नाथांचे भक्त, गावातील सर्व प्रतिष्ठीत,सर्व नाथवंशज,पत्रकार, पोलिस कर्मचारी व संत महंत महाराज मंडळी यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता रांजनाची परंपरेने पुजा करण्यात येऊन रांजनात पाणी भरण्यास सुरुवात झाली.नाथषष्ठी यात्रा निमित्ताने पैठण नगरपरीषदेच्या वतीने येणाऱ्या लाखो भाविकांना सुविधा देण्यासाठी नगरपरीषदेच्या वतीने ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष आगळे, अश्र्विन गोजरे यांनी दिली
———–

प्रतिक्रिया
हभप प्रविण महाराज गोसावी (१३ वे नाथवंशज, पैठण) : अत्यंत मंगलमय व पवित्र वातावरणात जे सांप्रदायाचे कळस आहेत असे संत श्रेष्ठ जगतगुरु तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमनाच्या दिवशी म्हणजेच तुकाराम बीजे पासून या पवित्र रांजना मध्ये गोदावरी नदीचे जल भरण्यास सुरुवात होते याचे पावित्र्य आपण सर्वांनी राखुन या रांजना मध्ये ४२५ वर्षांपासून चालत आलेली परंपरा व तिचा अधिकार त्यावर असणारी श्रद्धा,निष्ठा नाथांचा पाईक म्हणून सर्व नाथभंक्तांनी पाळावी ही नाथ चरणी प्रार्थना.