निफाडवाडी, कोरलवाडी, रामाचीवाडी या आदिवासीं वाड्यांवर कपडे,जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  !

0

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )सामाजिक कार्याची आवड आणि निवड ही माणसाच्या अंगीकृत स्वभावातून निर्माण होते.आणि हे कार्य करण्याकरिता कुठलीही वेळ – काळ पहिली जात नाही तर मनातील प्रबळ इच्छाशक्तीच या अश्या क्षणांना निर्माण करते ! आणि अश्याच प्रेरणादायी क्षणांनी आज एक सामाजिक कार्य सजलं ते केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था व श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता सा.संस्था या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि राजू मुंबईकर आणि  संगिताताई ढेरे मॅडम यांच्या  औदार्यातून पेण तालुक्यातील निफाडवाडी,पनवेल तालुक्यातील तारा येथील कोरलवाडी आपटा येथील रामाचीवाडी  या आदिवासी वाड्यांवर डाबर  या नामांकित कंपनीच्या वेदिक चहापावडरची पाकीटं रिअल फ्रेश फ्रूट ज्यूसच्या रिअल मँगो बॉटल्स(  एक लिटर ), लीची मिक्स फ्रूट ज्यूस पाकीटं( एक लिटर) , नारळ पाण्याच्या बॉटल्स,किराणा सामान,चटई, महिला भगिनी करिता साड्या आणि युवती करिता टॉप्सचं आणि सँनिटरीपॅडचं वाटप  करण्यात आले. आले.सोबतच राजू मुंबईकर यांच्या मनाच्या मोठेपणातून व औदार्यातून एक संकल्परुपी कार्य साकारलं गेलं ते म्हणजे कोरलवाडी  या आदिवासीं वाडीवरील एक गरीब निराधार  आजी- आजोबांना ज्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबात आत्ता कुणीही उरलं नाही.त्या आजी  – आजोबांना किराणा सामान, चटई  देण्यात आल्या  आणि त्यांचं जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत त्यांना लागणारा जीवनावश्यक किराणा सामान हे राजू मुंबईकर  यांच्या कुटुंबाकडून आयुष्यभर पुरविल जाईल असं आश्वासन दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here