पैठण,दिं.३१(प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच्या जयंती निमित्त पोरगाव येथे गावातील दोन महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सदर पुरस्कार वितरण महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायतस्तरीय ग्रामपंचायत कार्यालय पोरगाव येथील सौ.सुनिता मधुकर निळ व श्रीमती शारदा एकनाथ गायकवाड यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ संगीता प्रभु निळ यानी सांगीतले की, शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा असे सांगितले व पुरस्कार प्राप्त महिलांना पुढील वाटचालीस त्यांना ग्रामपंचायत तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मिनाबाई ससाने, शोभाबाई गायकवाड, मिनाबाई गायकवाड, शांताबाई गायकवाड, प्रद्युम निळ, अरुण डोईफोडे, ज्ञानेश्वर भालेकर, राजु निळ, भरत गायकवाड, अजहर शेख, सतिष मारोती निळ, सुरेश डोईफोडे, लक्ष्मण भालेकर, दिलीप डोईफोडे, नारायण विर, सतिष पवार, सिमा गायकवाड ,अनुसया पवार,(अंगणवाडी सेविका), शितल जाधव (मदतनिस), प्रेरणा राठोड,. मंगल थोटे (आशा कार्यकर्ती) याच्यासह अंगणवाडी सुपरवायजर श्रीमती काळे , तलाठी श्रीमती मेघरे एस जी, सरपंच सौ संगीता प्रभु निळ, उपसरपंच बिहारीलाल गुलाब रोठोड, ग्रामसेवक विनायक इंगोले सह ग्रामपंचायत सदस्य , विविध विकास कार्यकारी सोसायटी संचालकसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते.