येवला प्रतिनिधी
पूनेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा कृती समितीची बैठक तळवाडे गावात दि.27 ऑगस्ट रोजी संपन्न झाली या बैठकीला तळवाडे गावातील जेष्ठ नागरिक श्री रावसाहेब रंभाजी आरखडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर श्री संजय मिस्तरी,दिनकर लोहकरे,भाऊ लहरे,प्रकाश जानराव,संजय पगारे, अनिल आरखडेः,रंभजी आर्खडे, अलीखान पटेल, फेरोज पटेल,शकुर पटेल,गणेश आरखडे,मन्सूर पटेल,चांगदेव भांगुडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .
येवला तालुकयातील उत्तर पूर्व भागाला संजीवनी म्हटल्या जाणाऱ्या पूनेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा हा मागील वीस वर्ष पासून फक्त एक राजकीय मुद्दा झाला आहे .कारण निवडणुका आल्या की पाटाच्या कामाला सूर्वात होते व निवडणुका संपल्या की मतदार संघातील नेत्यांना व मंत्र्यांना या पूनेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा च्या कामाचा विसर पडतो व काहीही तांत्रिक अडचणी असल्याचे कारण पुढे करून काम बंद केले जाते आज पर्यंत या कालव्याच्या कामाला कोट्यवधी निधी मंजूर झाल्याचे दाखवले गेले मात्र कालव्याचे काम मात्र त्या प्रमाणात झालेले नाही हे येवल्याच्या उत्तर पूर्व भागातील नागरिकांना कोठेतरी खुपत आहे आणि येणार्या निवडणुका मध्ये निश्चितच याचा दणका राजकीय नेत्यांना मिळणार यात काही शंका नाही असे मत संजय पगारे यांनी या बैठकीत व्यक्त केले व जर सरकारने
पूनेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचया कामाची दखल घेतली नाही तर पुढील काळात या संदर्भात कृती समितीच्या वतीने विधान भवनावर बिऱ्हाड मोर्चाच्या आयोजन करण्याचा इशारा या वेळी सरकारला व संबधित मंत्र्यांना देण्यात आला