
पैठण,दिंं.१४: पैठण येथील शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४२४ व्या नाथ षष्ठी उत्सवास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून पायी दिंड्या दाखल झाल्या होत्या वाळवंटातील दिंडी फडात जाऊन पैठण नगरपरीषदेच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष आगळे पाटील यांच्या हस्ते दिंडी प्रमुख यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पैठण नगरपरीषदेचे स्वच्छता निरीक्षक अश्र्विन गोजरे पाटील, अशोक मगरे, धर्मराज उजगिरे,व्यकंटी पापुलवार,मदन घुसिंगे सह पैठण नगरपरीषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.