पैठण,दिं.३१.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथे मधील चार वर्षापासून सुरू असलेल्या प्रवाह परिवार उपक्रम (अनाथश्रम) येथील अनाथ मुलींनी काल दिनांक 30 ऑगस्ट 2023 बुधवार रोजी पैठण येथील खुले कारागृह येथे जावून कैदी बांधवांच्या हातात राख्या बांधून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा केला. यावेळी कारागृहातील सर्वच कैदी बांधवांचे डोळे पाणावले गेले. सर्व कैदी बांधवांनी प्रवाह परीवराचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी कारागृहाचे अधीक्षक धनसिंग कवाळे साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आजपर्यंत माझ्या 20 वर्षाच्या काळात हा आनंदमयी प्रसंग प्रथमच मी अनुभवला आहे. प्रवाह परिवाराचे संस्थापक प्रा.रामेश्वर गोर्डे हे नेहमीच आश्रम मधील मुला/मुलींच्या कला गुणांना वाव मिळावा व ही सर्व मुले भारतीय संस्कृतीनुसार घडावित या हेतूने प्रयत्नशील असतात. हे मी मागील काही वर्षांपासून अनुभवतोय. त्यांचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. असे कवाळे साहेबांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी प्रवाह परिवाराच्या प्रकल्प प्रमुख सौ.हेमा रामेश्वर गोर्डे, शितल अकॅडमीच्या मुख्याध्यापिका लुबेना मॅडम, लहू ढोले, गणेश विखे, करण सातपुते यांच्या सह प्रवाह परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.