बाळकृष्ण जगन्नाथ ठाकूर यांचे निधन.

0

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण जगन्नाथ ठाकूर यांचे बुधवार दिनांक 7/12/2022 रोजी आकस्मिक निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 80 होते.

 बाळकृष्ण ठाकूर हे भेंडखळ ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष होते. तसेच भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे उपाध्यक्ष पद त्यांनी भूषवलेले आहे. बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलना मध्ये न्याय हक्कासाठी  संघर्ष करून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे.1984 च्या शेतकरी आंदोलनामध्ये कार्यरत असताना त्यांच्यावर लाठी हल्ला झाला होता.त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. सामाजिक धार्मिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग होता. ते अभ्यासू असल्यामुळे त्यांचं वक्तृत्व प्रभावी होते.           

 भेंडखळ गावामध्ये नाट्य कलेचे जतन व्हावे म्हणून त्यांचे सहकार्य होते . ते आदर्श कला नाट्य मंडळ भेंडखळ (ठाकूर आळी) चे सूत्रधार व मार्गदर्शक होते.अंत्यसंस्कारवेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या आकस्मिक निधनाने ठाकूर कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार, ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here