इंडिया अन् भारत
एकनाणे दोन बाजू
वादविवाद कशाला
अजोड असे तराजू
अनिश्चित मन कसे
कुठली घ्यावी बाजू
उगे भटके जंजाळा
रहावे आपण बाजू
तापल्या तव्यावरती
भाकरी मस्त भाजू
ओले करुन घे अंगा
पडत्यापावसा भिजू
डाव उजवा कशाला
भक्कम दोन्ही बाजू
नाठाळा हवा विषय
संभ्रम लागतो माजू
पाहे आपलाव्यापार
दुकाने लागती सजू
तेल ओततात कुणी
आगी लागता विझू
त्यात काय ठरवायचे
कुठले आदर्शा भजू
देश प्रेम दिसो खुले
बा नका फुका लाजू
मत मांडायला स्पष्ट
नका बोलायला धजू
एकजुटीत बळकटी
उच्च स्थानी विराजू
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.