फलटण प्रतिनिधी. श्रीकृष्ण सातव.
प्रतिवर्षीप्रमाणे महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, पुणे, यांच्यातर्फे सन 21ृ-22 मधील निवृत्त सेवा पुरस्काराचे वितरण 7 जानेवारी 23 रोजी श्री क्षेत्र पैठण, जि.औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमासाठी सेक्सीरोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे हे उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील सहा विभागातील एकूण 52 सदस्यांना हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. यामध्ये सात विभागातील पुरस्कारार्थी ची संख्या पुढील प्रमाणे आहे.पुणे 15 ,नाशिक12, नागपूर 8,कोकण 6, औरंगाबाद 7आणि अमरावती 4. महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांचे सन्मानचिन्ह, गौरव पत्र, शाल व रोख 500 रुपये आणि पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यामध्ये जिल्हा निहाय पुरस्कार त्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. पुणे 7,सांगली,गडचिरोली प्रत्येकी 5,जळगाव ,औरंगाबाद ,प्रत्येकी 4, अहमदनगर,पालघर, नंदुरबार, प्रत्येकी 3, गोंदिया, सोलापूर ,पालघर ,सिंधुदुर्ग, प्रत्येकी 2आणि सातारा ,रत्नागिरी, रायगड ,कोल्हापूर ,यातील प्रत्येकी 1 पुरस्कार प्राप्त संघटनेचे सभासद आहेत.