माहूर तालुक्यातील मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांकरिता आजपासून असहकार आंदोलन

0
फोटो : मग्रारोहयोचे कंत्राटी कर्मचारी यांनी तारीख 18 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार वि.टी. गोविंदवार यांना असहकार आंदोलनाचे निवेदन दिले.

मागण्या मान्य न झाल्यास तारीख एक फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे
………………………………………………………………
माहूर: ( बालाजी कोंडे) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील दहा ते बारा वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजपासून विविध मागण्यांकरिता असहकार आंदोलन सुरू केले असून या आंदोलनात माहूर तालुक्यातील मग्रारोहयो चे सर्व कंत्राटी कर्मचारी सहभागी झालेले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून तारीख एक फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात  येणार आहे.
                                     मग्रारोहयो कंत्राटी कर्मचारी यांनी – मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंध मध्ये समायोजन करण्यात यावे, पश्चिम बंगालच्या धरतीवर मानधन देण्यात यावे, योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी, ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, मध्यप्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी या मागणीसाठी आज (ता.25) बुधवार पासून असहकार आंदोलन करण्यास सुरुवात झाली आहे.
                           सदरील असहकार आंदोलनात माहूर तालुक्यातील मग्रारोहयो चे कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संजीव राठोड, तांत्रिक सहाय्यक आनंद भिसे, तांत्रिक सहाय्यक बालाजी खरात, तांत्रिक सहाय्यक ज्ञानेश्वर डुबुकवाड, तांत्रिक सहाय्यक सतीश जाधव, संगणक चालक ज्ञानेश्वर कयापाक, संगणक चालक दीपक वरकटे, संगणक चालक अभिजीत कांबळे हे सहभागी झाले आहेत.
                            माहूर तालुक्यातील मगरारोहयोचे कंत्राटी कर्मचारी आज बुधवारपासून असहकार आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन माहूर तहसील कार्यालयात तारीख 18 जानेवारी रोजी देण्यात आले आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तारीख एक फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे माहूर तालुक्यात सुरू असलेली मग्रारोहयो च्या कामावर कुठलाही परिणाम होऊ नये याकरिता प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here