एलआयसीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा एमडीआरटी पुरस्काराचे झाले मानकरी
येवला, प्रतिनिधी : कामयाबी एक दिन मे नही मिलती,मगर किसी ने ठान ली तो एक दिन जरूर मिलती है…जिद्द,कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणताही सामान्य माणूस प्रचंड मोठी कामगिरी करू शकतो.हे च सिद्ध करून दाखवले कोळगाव या छोट्याशा खेडेगावतील शेतकरी कुटुंबतील सुदाम गाडेकर यांनी.
भारतीय जीवन बिमा निगमतर्फे दिला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा एमडीआरटी बहुमानाचा पुरस्कार येवले तालुक्यातून प्रथमच त्यांनी पटकावला आहे.त्यामुळे त्यांना अमेरिका दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली आहे एमडीआरटी २०२३ हा बहुमान पटकावणारे ते येवला तालुक्यातील प्रथम विमा सल्लागार आहेत.एक सामान्य शेतकरी पुत्र अमेरिका वारी करतोय, ही समस्त तालुकावासीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.त्यामुळे तालुकाभरातून त्याचे कौतुक होत आहे.ग्रामीण भागात दुर्लक्षित करण्यात येणारा जीवन विमा व आरोग्य विमा योजनांचा लाभ अनेक गरजूंना मिळवून देण्यासाठी सुदाम गाडेकर यांनी गेली सोळा वर्ष कठोर परिश्रम घेतले आहे.या कामात भारतीय जीवन विमा निगम मनमाड शाखेचे शाखाधिकरी अरुण सोनवणे,नवीन व्यवसाय विभागाचे अधिकारी अशोक कुक्कर, विकास अधिकारी रोहित पगारे,संजय दारोळे, मनोज वाघ,सुनील वाढवणे,देवेन्द्र पगार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.मनमाड शाखेतील कर्मचारी, विमाप्रतीनिधी संघटना,व नगरसूल ग्रामस्थांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.