उरण दि १३(विठ्ठल ममताबादे): उरण दि १३(विठ्ठल ममताबादे) गळ्यात इष्टलिंग, कपाळाला भस्म व भगवान शिवाला आराध्य दैवत मानणारा, शैव संस्कृतीचे आचरण,पालन करणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा समिती व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे या सामाजिक संस्था कार्यरत आहे.
या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९/१२/२०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता धर्मवीर आनंद दिघे सभागृह,गांधी नगर चौक, डोंबिवली(पूर्व ), मुंबई येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व जाती पोट जातीतील इच्छुक वधू वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे वधू वर मेळाव्याचे ३५ वे वर्ष आहे. इच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी उपाध्यक्ष बसवंतराव अळगी फोन नंबर -९६६४१४२४१२,९८२०० ६१३६२ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.