पैठण,दिं.३१:पैठण च्या दक्षिण कशितील सम्राट शालिवाहनाच्या पालथ्या नगरीत शककर्ता सम्राट शालिवाहन राजाची जयंती चैत्र शुध्द दशमी शुभ पर्वावर तिर्थाखांब उद्यानात महराष्ट्रातील प्रमुख कुंभार बांधवांनी दि. ३१, शुक्रवारी शालिवाहन राज्याच्या जय जयकारात साजरी केली.
यावेळी सूर्यभान घोडके, गणेश रोकडे, गणेश पांजवाले, राम पंजावाले, विठ्ठल रोकडे शमशेठ राजे, रंगनाथ सूर्यवंशी, नितीन घोडके, संतोष म्हेत्रे, मोहन जगदाळे, बंडेराव जोशी, दत्ता कुंभार, दिनेश पारिक, लाला रीळे आदींची भाषणे झाली या प्रसंगी केंद्र सरकारने शालीवाहनाच्या पालथ्या नगरीत उगवलेली वेड्या बाभळीची संपूर्ण झाडे तत्काळ काढून घ्यावीत व पर्यटकांना पाहण्यासाठी पालथी नगरी मुक्त करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व श्री महादेव खटावकर, दादा अवसालकर निवृत्ती जाधव, अंबादास रोकडे, अशोक भालेकर, ऋषी पंजावाले, ज्ञानेश्वर दळे, प्रमोद पंजावाले, विनोद पंजावाले , भागवत रोकडे, कृष्णा पंजावाले, संजय दळे, मनोज रूपेकर , प्रसाद खिस्ती, अजय पंजावाले रवी पंजावाले आदींनी विशेष परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाने सांगता झाली. कुंभार समाज विकास समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
