शिक्षण हे सर्वात प्रभावी परिवर्तनाचे शस्त्र – राजेन्द्र निकम

0

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

नाशिक : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय, पाडळी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंती समारंभाचे अध्यक्ष बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी . देशमुख डाँ.बाबासाहेब आंबेडकरानी शिका सघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिला . शिक्षण हे वाघीणिचे दुध आहे ते सर्वांनी प्राशन केले पाहिजे असे देशमुख म्हणाले .प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख अतिथी शिक्षक विद्यार्थी यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे व गित गायन केले. काही विद्यार्थ्यांनी पोवाडेही गायली. कुमार सुजल शिंदे, दर्शन वारूंगसे, श्याम रेवगडे, पूजा पोटे यांनी उत्कृष्ट भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कोटकर एस. एम यांनी केले. व विद्यालयाचे उपशिक्षक श्री. निकम सर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या विचाराने कार्याने आज आपला देश प्रगतीपथावर आहे. अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर पाहिलेले स्वप्न संविधानाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. यावेळी प्रमुख अतिथी शालेय समितीचे चेअरमन श्री. चंद्रभान रेवगडे, श्री. निवृत्ती पाटोळे, कुमारी संजना पाटोळे, संस्थेचे कोषाध्यक्ष रेवगडे टी.के, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर,आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख,सी. बी. शिंदे, के.डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे,आर. एस. ढोली,थोरे ए.बी. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here