शेतकऱ्याची कन्या कवयित्री पूजा सांगळे लिखित ‘आयुष्य आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन 

0

येवला (प्रतिनिधी)

       सध्याची युवापिढी ही सामाजिक माध्यमांभोवतीच गुरफटली आहे मात्र या गोष्टीला छेद देत पूजा सांगळे हिने ग्रामीण भागात राहूनही तिची प्रतिभा दाखवत पुस्तक लिहिले ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. माझ्या मतदार संघातील सुमारे साडेपाच हजार शाळांमध्ये हे पुस्तक पोहोचविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केले.

    सत्यगाव ता.येवला येथील अत्यंत प्रतिभावंत अशी कु.पूजा सांगळे हिच्या, ‘आयुष्य आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके होते.

     साहित्य हे मानवी मनाचे खाद्य असून  संस्कृती टिकवण्याचे मध्यम आहे साहित्य टिकले तरच संस्कृती टिकेल. साहित्य वाचनाने मनुष्य समृद्ध होतो.प्रतिभा ही कुठल्याही वर्गाची मक्तेदारी नाही त्यामुळे सत्यगाव सारख्या सामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी इतक्या कमी वयात साहित्य निर्मिती करून ग्रंथ प्रकाशित करते ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन जेष्ठ हिंदी अनुवादक,समीक्षक प्रा.डॉ.जीभाऊ मोरे यांनी केले.

  आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी पूजा सांगळे हिच्या प्रतिभेचे,लिखाणाचे कौतुक करत तिच्या हातून अधिक पुस्तके लिहिली जावीत अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास गुरुवर्य राजू बाबा ,  कोल्हे सह. सा.कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे , कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष भारत दिघोळे, मा.पं.स.सभापती प्रवीण गायकवाड, मनसे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे, प्रमोद बोडखे माझी सरपंच राजापूर,  कवी लक्ष्मण बारहाते, लेखक पत्रकार किरणकुमार आवारे, कवी,गझलकार प्रा.शरद शेजवळ,राजरत्न वाहूळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच पूजा सांगळे यांचे वडील बाळकृष्ण सांगळे यांनी तिला वेळोवेळी सहकार्य केले  . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अश्विनी सांगळे हिने आणि वाघ सर यांनी केले . तसेच आभार डॉ. ईश्वर आव्हाड यांनी मानले . पुस्तकं प्रकाशन समिती सत्यगाव यांनी मोलाचे सहकार्य केले . आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here