साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना येवल्यात जयंतीनिमित्त अभिवादन…..

0

येवला प्रतिनिधी :

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व सार्वजनिक जयंती उत्सव समिती, येवला यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. भगवान चित्ते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून येवला तालुक्याचे ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे, मंत्री मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक मा. बाळासाहेब लोखंडे, वैद्यकीयरत्न डॉ. सुरेश कांबळे, कॉ. किशोर जाधव, येवला शहर पोलीस निरीक्षक मा. विलास पुजारी, संकेतभाऊ शिंदे, सुभाष गांगुर्डे, बाळासाहेब कसबे जयंती उत्सव समिती अध्यक्ष आकाश खैरनार, नचिकेत जाधव आदी विचारपीठावर उपस्थित होते. यावेळी अॅड. माणिकराव शिंदे, मा. बाळासाहेब लोखंडे, नितीन संसारे, आदर्शा लाठे आदींनी अण्णाभाऊंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. सुरेश कांबळे यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊंच्या जीवनावर व त्यांच्या साहित्यिक कृतीवर प्रकाश टाकताना सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आज रोजी आकाश गंगेमध्ये एक तारा तळपत आहे. आजच या ताऱ्याचे अण्णाभाऊ साठे असे नामकरण करण्यात आले आहे. उद्योजक अश्विन तुपे, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रशासकीय पातळीवर मोठा संघर्ष करून या ताऱ्याला अण्णाभाऊंचे नाव देण्यासाठी योगदान दिले आहे. शोषित वंचित आणि स्त्रिया यांना नायक करून अण्णाभाऊंनी त्यांचं जीवन व वेदना यांना उजेडात आणले. अण्णाभाऊंनी भारतातच नव्हे तर परदेशात देखील आपल्या लेखणीचा ठसा उमटवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर रशियात पहिला पोवाडा गाऊन अण्णाभाऊंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर छत्रपतींना अभिवादन केले असे प्रतिपादन डॉक्टर सुरेश कांबळे यांनी केले. 

त्यानंतर सभेत सत्यशोधक डेमोक्रॅटिक पक्षाचे कॉ. किशोर जाधव म्हणाले की, बँका, रेल्वे, हवाई अड्डे, रस्ते, नवरत्न कंपन्या अशा सर्वांचे खाजगीकरण करून सामान्य माणसाचे जगणे अवघड बनवले जात आहे. “स्मार्टफोनचा अमर्यादित वापर” हे देशातील आर्थिक सामाजिक मुद्यांकडे दुर्लक्ष करून देशात बेरोजगारी वाढवणारे मोठे हत्यार बनवले जात आहे. डिजिटलायजेशन व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या मुळे अनेक क्षेत्रातील कनिष्ठ पातळीवरील रोजगार जवळपास संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे. तसेच या मुळे ३५ टक्के रोजगार कमी होत आहे असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. याचाच अर्थ भांडवलशाही कष्टकरी व गोरगरीब जनतेचा रोजगार हिसकावून दलित-आदिवासी-शेतकरी यांच्या जगण्यालाच आव्हान देत आहे. बेगडी राष्ट्रवाद निर्माण करून, साधन संपत्तीचे खाजगीकरण करून भांडवलदारांच्या घशात देशाची संपत्ती घालून भांडवलशाहीला बळ देण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे या भांडवलशाही विरोधात जनहिताचा लढा उभारण्यासाठी अण्णाभाऊचे विचार व विद्रोही साहित्यसंपदा महत्वाची आहे. या नंतर अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड भगवान चित्ते यांनी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी जाती व्यवस्था आणि भांडवलशाही या विरोधात आपली लेखणी चालवली आणि फकीरासारखी सर्वोत्कृष्ट कादंबरी निर्माण केली. अण्णाभाऊंचे साहित्य व लेखणीनी हे खाजगीकरण, भांडवलशाही व जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन केले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन संसारे तर आभारप्रदर्शन प्रा. प्रविण अहिरे सर यांनी केले. या प्रसंगी गोटू मांजरे, सागर पडवळ, प्रवीण खडांगळे, दीपक गांगुर्डे, रत्ना खरात, नवनाथ पोळ, मंगला खरात, रोहित पवार, शोभा जोगदंड, संदीप धोत्रे, युवराज पवार, अमोल खैरनार, वैभव पगारे, चंदाबाई खरात, नाना शेलार, राईबाई खैरनार,  शरद खैरनार, तुकाराम जाधव, कल्पना खैरनार, शकुंतला खैरनार, गिरीजा खैरनार, कुसुमताई लोखंडे, छाया पोळ, मयूर आव्हाड, सुनील खैरनार, अमोल खैरनार, वसला पोळ, प्रसाद खैरनार, रवींद्र खैरनार, गणेश पोळ, कैलास जोगदंड, गुरु भालेराव, के. आर. तूपसौंदर,सर आदी उपस्थित होते. स्वामी मुक्तानंद विद्यालय तर्फे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली व अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी यात सहभागी झाल्या होत्या प्राचार्य कदम सर, प्रा. प्रसाद कुलकर्णी सर, फणसे मॅडम, वाकचौरे मॅडम, विलास चित्ते, भागवत सर, आर. बी. सोनवणे सर आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here