उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )जानेवारी 1984 मधील गौरवशाली व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्मे नामदेव शंकर घरत (चिर्ले ), हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम ), हुतात्मा महादेव हिरा पाटील (पागोटे ), हुतात्मा केशव महादेव पाटील (पागोटे ), हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल (पागोटे )यांचा 39 वा स्मृतीदिन मंगळवार दि 17 जानेवारी 2023 रोजी ग्रामपंचायत पागोटे व ग्रामविकास मंडळ पागोटे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा, पागोटे येथे मोठ्या उत्साहात विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांद्वारे साजरे करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत पागोटे व ग्रामविकास मंडळ पागोटे यांच्या संयुक्त विद्यमाने 1984 च्या पाच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हा परिषद शाळा, पागोटे येथे 39 वा स्मृतीदिन साजरा करण्यात येणार आहे. दि 17 रोजी सकाळी 10 वाजता हुतात्म्यांना मानवंदना, 11 वा. हुतात्म्याच्या स्मारकास व प्रतिमांना हार अर्पण करणे, दु.12 वा.नवघर फाटा रेल्वे क्रॉसिंग येथे हुतात्म्यांना मानवंदना, दु.12:30 वाजता कबड्डी स्पर्धेचे आयोजन, रात्री 8 वा. सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच कुणाल पाटील यांनी दिली आहे.