नाशिक प्रतिनिधी : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा अपघातात मयत झालेल्या विद्यार्थी कै.अलोक संदीप रेवगडे याच्या पालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणाऱ्या मदत निधीचा दानादेश देण्यात आला. मयत अलोक संदीप रेवगडे हा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता ७ वीत शिकणारा अतिशय हुशार शांत, विद्यार्थीप्रिय हा अचानक पंतग उडविण्याच्या नादात आपल्या घराशेजारील विहिरीत तोल जाऊन पडला. मित्रांनी आरडाओरडा करून प्रसंगावधान राखत जन समुदाय जमा झाला. परंतु विहिरीची खोली अधिक असल्यामुळे मदतीच्या अगोदरच त्याला मृत्यूने कवटाळले. शाळेतील अतिशय गुणी असा विद्यार्थी आमच्यातून निघून गेला. याची मनामध्ये खंत नेहमी राहिल. अशा शब्दात शाळेचे मुख्याध्यापक एस. बी देशमुख यांनी आपली भावना व्यक्त केली.
मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हातावर असून त्याचे पालक मोलमजुरीचे काम करतात . बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून त्याच्या कुटुंबीयाना राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्हा परिषद नाशिक कार्यालयाकडून नुकताच १,५०,०००/-(एक लाख पन्नास हजार रुपये) मदतीचा धनादेश कुटुंबाकडे सुपूर्त केला.
याकामी शालेय समितीचे सदस्य धनंजय रेवगडे,चेयरमन चंद्रभान रेवगडे, आजोबा पंढरी बाजुनाथ रेवगडे,वडील संदीप रेवगडे, आई मनिषा रेवगडे, ऋषिकेश रेवगडे,अरुण रेवगडे, सोमनाथ शेलार,पोलिस पाटील भाग्यश्री पाटोळे, नवनाथ पालवे,सोपान पाटोळे उपस्थित होते.यांनी शिक्षण विभागाचे व बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे, बी.आर.चव्हाण,आर. व्ही.निकम,एस.एम.कोटकर,आर.टी.गिरी,एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे, के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे यांचे ऋण व्यक्त केले.