स्मृतिदिनी अभिवादन व मान्यवरांना पुरस्कार प्रदान
मलकापूर प्रतिनिधी : सामाजिक परिवर्तनाचा ध्यास जीवनभर अंगी बाळगून जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे सक्रिय योद्धे व बाबासाहेबांची चळवळ संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणारे समाजरत्न दयाभाई खराटे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी संसार आणि स्वतःच्या घराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी खर्च केले,त्यांच्यासारखे कार्यकर्त्यांनी चळवळीसाठी काम केले त्यामुळेच आंबेडकरी चळवळ ही लढाऊ चळवळ मानली गेली चळवळीप्रती अगाध निष्ठा व त्यागामुळेच दयाभाई खराटे आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज ठरले असे मत प्रसिद्ध स्तंभ लेखक आणि राजकीय विश्लेषक दादाभाऊ अभंग यांनी मलकापूर येथे केले
आजीवन समाजकार्याला वाहून घेणारे भारतीय बौद्ध महासभा माजी अध्यक्ष,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ नामांतर चळवळीचे अग्रणी शिलेदार समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या 16 व्या स्मृतिदिनानिमित्त मलकापुर येथे अभिवादन सभा संपन्न झाली या सभेला प्रमुख वक्ते म्हणून दादाभाऊ अभंग भीमा कोरेगाव विजयस्तंभ संवर्धन व संरक्षण समिती यांची उपस्थिती होती ,सभेचे अध्यक्षस्थानी भा.बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. एस.वले सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांतभाऊ वाघोदे, मलकापूर ग्रा.पो.स्टे.ठाणेदार संदीप काळे, एमआयडीसी पो.स्टे.ठाणेदार हेमराज कोळी ,शाहीर डी.आर.इंगळे, वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, खामगाव कृ ऊ.बा.स.उपसभापती संघपाल जाधव, प्रकाश दांडगे, अजय सावळे, सुशील मोरे, प्रा.एस.डी.झनके, प्रा.रमेश डोंगरे, प्रा.अरुण सावंग उपस्थित होते
सर्वप्रथम भंते महाणाम,भंते संघपालबोधी,भंते काश्यप व उपस्थित मान्यवरांचा हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला व दयाभाई खराटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यातआहेत फाउंडेशन वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार दादाभाऊ अभंग, महात्मा ज्योतिबा फुले साहित्यिक जीवन गौरव पुरस्कार डॉ.आर. डी.इंगोले सर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव वानखेडे, महाकवी वामनदादा कर्डक प्रबोधन जीवन गौरव पुरस्कार मीनाताई खरे यांना प्रदान करण्यात आला सभेचे प्रास्ताविक अतिषभाई खराटे यांनी तर सूत्रसंचालन भाऊराव उमाळे यांनी केले