उरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) शहरं असोत की गावं प्रत्येक शहरवासियांना जसा आपल्या शहरांबद्दल अभिमान असतो तसाच प्रत्येक गाववासियांना आपल्या गावां बद्दल अभिमान असतोच. “माझा गावं माझा अभिमान” हे ध्येय उराशी बाळगत आपल्या दातृत्वातून अनेक गावांच्या मुख्य प्रवेश द्वारांच्या वेशीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाईने उजळून दिसणारे गावांच्या नावांचे नवीन नामफलक( बोधचिन्ह )ज्यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून बनवून देण्याचं कार्य ज्यांच्या मनाच्या मोठेपणातून साकारलं गेले असे सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तिमत्व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून उरण येथील कळंबुसरे गावात आय लव्ह कळंबुसरे या नावाचं विद्युत रोषणाईने चमकणारे नवीन नामफलक बनवून देण्यात आले व त्या नूतन नामफलक अनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन कळंबुसरे गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य समीर म्हात्रे यांच्या तर्फे करण्यात आले.
आज पर्यंत अनेक गावांच्या नवीन नावांच्या नामफलकांचे लोकार्पण करून अनेक नामफलक तयार बनवून अनावरण सोहळ्या करिता प्रतीक्षेत आहेत हे ज्यांच्या संकल्पनेतून साकारत आहे असे राजू मुंबईकर यांनी समीर म्हात्रे यांच्या मागणीला मान देऊन कळंबुसरे गावांकरिता आणि ग्रामस्थांकरिता गावाच्या नावाचं विद्युत रोषणाईने चमकणारे नवीन नामफलक (बोधचिन्ह )महाशिवरात्री उत्सवाच्या पूर्व संध्येला एक अनोखी भेट म्हणून देण्यात आली.
या नवीन नामफलकाच्या अनावरण सोहळा कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून रायगड भूषण राजू मुंबईकर,राणीताई मुंबईकर, अनिल घरत (उरण तालुका सचिव – आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था),हिराचंदजी म्हात्रे (उपाध्यक्ष – गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे) आदी मान्यवर उपस्थित होते.