अनिल वीर, सातारा : कोरेगाव भीमा-पेरणे फाटा (ता. हवेली) येथे दि.१ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ शौर्यदिनी भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भीमसैनिकांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, त्याचबरोबर अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि ‘जय भीम’ घोषवाक्य, अशी विशेष सजावट करण्यात आली आहे.
या सजावटीसाठी बार्टीचे संचालक, निबंधक तसेच जिल्हाधिकाऱ्यांची शासन मान्यता घेण्यात आलेली आहे. यंदाच्या शौर्यदिनी भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच ‘जय भीम’ घोषवाक्य आणि निळा ध्वज, असा अनोखा संगम ऐतिहासिक विजयस्तंभावर दिसणार आहे. यंदा विजयस्तंभाची सजावट भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून करण्यात आल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीने जाहीर केले आहे.