करंजा कोंढरीपाडा येथील हनुमान मंदिरात मुर्तीची विटंबना.

0

दृष्कृत्य करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. कारवाई न केल्यास ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा प्रशासनाला इशारा.

उरण दि 9 (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या करंजा कोंढरी पाडा येथील श्री हनुमान मंदिर हे समस्त करंजा वासीयांचे ग्रामदैवत आहे. श्रद्धास्थान आहे. हे मंदिर 250 वर्षापूर्वीचे असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. अनेक वर्षापासून येथे हनुमान जयंती तसेच विविध सामाजिक धार्मिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात अशी शेकडो वर्षाची ऐतिहासिक व धार्मिक परंपरा असलेल्या श्री हनुमान मंदिर कोंढरीपाडा, करंजा , ता.उरण,जि. रायगड येथे मात्र शनिवार दि 6 मे 2023 रोजी संध्याकाळी श्री हनुमान मूर्तीची मूर्तीची विटंबना झाली असून धार्मिक परंपरेला गालबोट लागल्याची घटना घडली आहे.

श्री हनुमान जयंती निमित्त पालखीला गावकीचा मुकूट श्री हनुमानाच्या मूर्तीस घालतात.ऐनवेळी मुकुट मूर्तीला घातले जात नाही.ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे  पालखी उत्सव संपला की हा मुकुट करंजा गावात राहणारे नारायण जनार्दन नाखवा यांच्या घरी ठेवला जातो. करंजा कोंढरीपाडा गावातील भालचंद्र नारायण पाटील (वय 60 वर्षे) यांचा मुलांचा दिनांक 5/5/2023 रोज़ी विवाह झाला होता. विवाह प्रित्यर्थ श्री हनुमान मंदिरात सदर कुटुंबातर्फे श्री सत्यनारायण महापूजा ठेवण्यात आली होती. महापूजेसाठी भालचंद्र पाटील यांचे सर्व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. शिवाय गावातील ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्री सत्यनारायणाची महापूजेची आरती व श्री हनुमान देवतेची आरती एकत्र झाली. श्री हनुमानाची आरती संपल्यानंतर श्री हनुमान देवतेचे दर्शन घ्यायला गेल्यावर श्री हनुमान मूर्तीचा डावा डोळा खोलगट  गेल्याचे ग्रामस्थांच्या, भाविक भक्तांच्या निदर्शनास आले.डावा डोळाच फोडला असल्याचे नागरिकांना दिसले.तेव्हा हनुमान मूर्तीचा डोळा खोलवर का गेला ? श्री हनुमान मूर्तीच्या डोळ्याचा शेंदूर कोणी काढला ? अशी विचारणा ग्रामस्थांनी केली असता मंदिरात हजर असलेले भालचंद्र नारायण पाटील यांनी सांगितले की त्यांची सत्यनारायणाची पूजा करण्या अगोदर हनुमान मंदिराचा गावकीचा मुकूट श्री नारायण जनार्दन नाखवा यांनी महापूजेच्या आरतीसाठी दिला नसल्याने त्यांना राग आल्यामुळे त्यांनी  श्री हनुमान मूतीचा डाव्या डोळ्यावरील शेंदूर काढला आहे.असे भालचंद्र पाटील यांनी सर्वांना सांगितले.आपली चूक लपविण्यासाठी भालचंद्र नारायण पाटील यांनी सर्व ग्रामस्थांच्या समक्ष श्री हनुमान मूर्तीच्या डाव्या डोळ्याच्या खोलगट भागात भालचंद्र पाटील यांनी स्वतःच्या हाताने शेंदुराचा लेप लावला.सदर सर्व दुषकृत्य  हे गावातील ग्रामस्थ अजिंक्य पाटील , विनोद कोळी, उमेश धामणकर, व्यंकटेश म्हात्रे, संदेश पाटील, कृष्णा पाटील यांच्या समक्ष ही घटना घडली आहे. 6/5/2023 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजण्याच्या सुमारास कोंढरीपाडा गावात राहणारे ग्रामस्थ भालचंद्र नारायण पाटील (वय 60 वर्ष) यांनी त्यांच्या मूलाच्या विवाह निमिताने केलेली महापूजा आणि मुकुट न दिल्याबद्दल रागाने श्री हनुमान मूर्तीचे डाव्या डोळ्यावरील शेंदूर काढून डाव्या डोळयाचा भाग खोलगट केला तसेच महापूजेची व दर शनिवारची आरती झाल्यानंतर शेंदूराचा लेप त्यांच्या हाताने लावून हेतूपुरस्पर जाणीवपूर्वक दृष्ट हेतूने धार्मिक श्रध्देचा अपमान करून सदर वातावरण व पवित्र वास्तु, मंदिर अपवित्र केले. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे धार्मिक भावनांचा अनादर केल्याने तसेच मूर्तीची विटंबना केल्याने उरण पोलिस ठाण्यात मूर्तीची विटंबना करणारे करंजा कोंढरीपाडा येथील ग्रामस्थ भालचंद्र नारायण पाटील (वय 60) यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत 295 व 295 A कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भालचंद्र नारायण पाटील यांनी मूर्तीची विटंबना केल्याने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई शासनाने करावी अशी मागणी श्री हनुमान देवतेचे भाविक भक्त,नागरिकांनी, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. दृष्कृत्य करणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासनच जबाबदार राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.मूर्तीची विटंबना झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची वातावरण पसरले आहे.मंदिराच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी कर्मचारी मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here