केमिस्ट असोसिएशन उलवे संघटना प्रथम क्रमांकाने सन्मानित.

0

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल एमपीएसी च्यावतीने “उत्कृष्ट जागतिक औषधनिर्माता दिन साजरा करणारा फार्मासिस्ट किंवा संस्था, संघटना, कॉलेजेस , औद्योगिक, शासकीय / निमशासकीय औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय प्रतिनिधी मधुन ” विशेष सन्मानाचे मानकरी विभागनिहाय काढले होते.त्यात मुंबई विभागातून जि रायगड व संस्था गटातुन उलवे  केमिस्ट असोसिएशन यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन MSCDA चे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुलजी अहीरे व उपाध्यक्ष धनंजयजी जोशी, रजिस्टार सायली मसाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी कौन्सिल च्या कार्यकारिणी सदस्या सोनालीताई पडोळे सदस्य  नितिनजी मनियार, मनोहरजी कोरे व DIC चे अध्यक्ष  गणेशजी बंगळे,ठाणे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, कल्याण केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागरजी कुळकर्णी व अंबरनाथ केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष  संजयजी जुमानी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी उलवे केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा व रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्या सीमाताई पाटील यांनी विशेष सन्मानामुळे माझी व उलवे असोसिएशनची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे सांगितले व फार्मसी कौन्सिल चे आभार व्यक्त केले.आरोग्य क्षेत्रात कार्यरत राहून विविध आरोग्य शिबीरे, आरोग्य विषयक जनजागृती आदी कामे उत्तमरित्या केल्याने केमिस्ट असोसिएशन उलवे संघटनेचा सत्कार झाला आहे.त्यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आल्याने केमिस्ट असोसिएशन उलवे संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here