संगमनेर : ख्रिस्ती विचार प्रणालीवर ज्यांची खरोखर श्रद्धा आहे. त्या प्रत्येकाच्या सहभागातून उभी राहिलेली महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद ही समतेची चळवळ असल्याचे प्रतिपादन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी केले. नुकतीच शासकीय विश्रामगृहामध्ये तालुक्यातील सर्व पंथीय ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ पूर्व नियोजन संदर्भातील बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस अँड.विजयानंद पगारे, लाजारास केदारी, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, सत्यानंद कसाब, सुधीर ब्रम्हे, प्रभाकर जगताप मेजर, बाळासाहेब भोसले, प्रभाकर चांदेकर, प्रवीण रोहम, थॉमस जगताप, रमेश ओहोळ, फुलचंद जगताप आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजाचे प्रलंबित प्रश्न ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून मार्गी लागतील अशी भावना व्यक्त करून गरीब, गरजू व विधवा महिलांसाठी विविध उपक्रमाद्वारे नाताळ साजरा करण्याबरोबरच परिषदेच्या कार्यास सर्वतोपरी सहकार्य राहील असे अँड. विजयानंद पगारे यांनी सांगितले. भोसले पुढे म्हणाले, आमचे हक्क आम्हाला उपभोगू द्या ते पायदळी तुडवू नका तो मानवतेचा अवमान आहे. याची जाणीव जागृती करणारी ही चळवळ असून सध्या धर्मांतराबाबतच्या गैरसमजातून ख्रिस्ती धर्मीयांना लक्ष केले जात असल्याने या होणाऱ्या अन्याय, अत्याचाराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून दखल घेण्याची मागणी त्यांनी केली.यावेळी यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष व स्वच्छता दूत म्हणून परिचित असलेले आदित्य घाटगे, व सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड यांना अँड.विजयानंद पगारे व लाजारस केदारी यांच्या हस्ते पंडिता रमाबाई शताब्दी महोत्सवा निमित्त सन्मानपत्र, शाल व संविधानाचे पुस्तक देऊन समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच यावेळी परिषदेच्या राज्य कार्यकारी समितीवर लाजरास केदारी, बाळासाहेब भोसले यांची तर जिल्हा समन्वयक विनोद गायकवाड, मार्गदर्शक रमेश जगताप तसेच संगमनेर तालुकाध्यक्षपदी प्रकाश भोसले, उपाध्यक्षपदी फुलचंद जगताप, भाऊसाहेब पवार, सचिव थॉमस जगताप, संपर्कप्रमुख सिमोन रूपटक्के, विलास शेळके आदींना अनिल भोसले व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी रीना भोसले, पुष्पाताई जगताप, सुवर्णा गायकवाड, वंदना भोसले, राणी कदम, योगिता घाटगे, यशस्विनी घाटगे, प्रवीण रोहोम, अनुप कदम, अनिल गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन सुहास गायकवाड यांनी केले तर थॉमस जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.