महाराष्ट्रातील मानवतावादी संत सुधारकांच्या विचार कार्याचा सत्ताधाऱ्यांना धाक प्रा : जनार्धन धनगे
येवला प्रतिनिधी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिका व भारतीय अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ६८ व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय कुसाळकर ( गटशिक्षणाधिकारी येवला ) हे बोलत होते.संत गाडगे बाबा यांचे जीवनकार्य व स्वच्छतेचे महत्त्व सांगितले.बाहेरील देश आपल्या देशाला मदत करतात त्यावेळी ते पहिल्यांदा देशातील स्वच्छता विचारतात त्याचवेळी विदेशी मदत आपल्याला मिळत असते एवढे महत्त्व स्वच्छतेला देण्यात येते म्हणून कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतः पासूनच करावी असे मत त्यांनी मांडले.आजची पिढी ही वाचनाकडे कशी वळेल याबाबत त्यांनी मत व्यक्त केले. मोबाईलचा वापर कमी करून पुस्तकांकडे कसं वळवता येईल याबाबत त्यांनी सविस्तर मत मांडले व गाडगेबाबांनी गाव स्वच्छतेबरोबर मानवी मनाची स्वच्छता आपल्या कीर्तन प्रबोधनातून केली असे मत व्यक्त केले.
अभिवादन सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा.जनार्दन धनगे सर यांनी संत गाडगेबाबांचे भजन,कीर्तन,प्रबोधन व आजच्या कीर्तनकारांच्या कार्य कृतीतील तफावत सांगून संत गाडगेबाबांकडे सर्व संतांचा वारसा होता व तो आजच्या कीर्तनकारांनी जपला पाहिजे,देशातील तमाम मानवतावादी संत सुधारकांच्या विचार कार्याचा सत्ताधार्यांना धाक असल्याचे मत व्यक्त केले. गाडगेबाबा यांचे विचार आचरणात आणला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी सार्वजनिक वाचनालय तथा राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्ती भूमी अभ्यासिका ते संस्थापक शरद शेजवळ कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष गोकुळ वाघ सर,शैलेंद्र वाघ सर, सुरेश खळे,वस्तीगृहाचे गृहपाल बी.डी. खैरनार,सामाजिक कार्यकर्ते जीवन खरे,भारतीय अकॅडमीच्या प्रशिक्षिका स्वाती औताडे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यार्थिनी विद्यार्थी साक्षी गायकवाड, सुप्रिया कुऱ्हाडे,गायत्री खोकले, शितल वाहूळ,अक्षय गरुड, ऋषिकेश वाघ ,सचिन गरुड, सिद्धार्थ गरुड ,रवी गरुड, मानव जाधव, राहुल गायकवाड, हेमंत पवार हे वाचनालयातील व वस्तीगृहातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय अकादमीचे संचालक राजरत्न वाहूळ यांनी केले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक शैलेंद्र वाघ सर यांनी केले, आभार गोकुळ वाघ सर यांनी मानले.