चाईल्ड केअर संस्थे कडून अन्नधान्य वाटप.

0

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )

चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड हे नाव रायगड वासीयांना नवीन नाही कारण चाईल्ड केअर संस्था आजवर संस्थापक अध्यक्ष  विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली सतत 8 वर्ष समाजाची जाण ठेवून सतत समाज सेवेचे कार्य करत आहे.आणि आजहि करत आहे.

 संस्थे तर्फे वेश्वी आदिवासी वाडीतील शाळेत मुलांना आणि वाडीतील भगिनींना अन्न धान्य किट वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास महामुंबई न्यूज चॅनल चे संपादक  मिलिंद खारपाटील  व चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे मीडिया सल्लागार  विठ्ठल ममताबादे, उरण शिक्षक पतपेढी संचालक  रमणीक म्हात्रे हे उपस्थित होते.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  विकास कडू यावेळी बोलताना म्हणाले की 

” हि सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे ह्या कार्यक्रमासाठी आदिवासी वाडीतील मुलांना, भगिनींना मदत  ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे सर्वांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणी अशीच मदत चाईल्ड केअर सामाजिक संस्थे च्या उपक्रमांना करत राहावे हि विनंती करतो. वेश्वी वाडी व उरण इंदिरा गांधी झोपडपट्टी मध्ये अन्न धान्य किट वाटप करण्यात आले.मी आमच्या संस्थेला ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी हातभार लावला त्यांचे आभार मानतो.हे श्रेय मी सर्व त्यांना देतो कारण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आमची संस्था पार पडू शकली “

ह्या कार्यक्रमास वेश्वी वाडीतील शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते. तसेच उरण येथील इंदिरा गांधी झोपडपट्टी व वेश्वी वाडीतील शंभर जणांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक रमणिक म्हात्रे  यांनी आपल्या भाषणात  सांगितले की ‘ चाईल्ड केअर सामाजिक संस्था हि अनेक वर्ष  उरण मध्ये नव्हे तर रायगड मध्ये समाज सेवेचे कार्य राबवत आहे आणि प्रामुख्याने चाईल्ड केअर संस्था हि आदिवासी वाड्यांमध्ये समाज सेवेचे अधिक कार्य करत आहे त्या साठी संस्थेचे करावे तेवढे  कौतुक कमी आहे ” सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मनोज ठाकूर (कार्याध्यक्ष ), ह्रितिक पाटील (उपाध्यक्ष )तुषार ठाकूर (कार्याध्यक्ष ), राजेश ठाकूर (खजिनदार )उद्धव कोळी (सहचिटणीस ), निवृत्ती ठाकूर (उपाध्यक्ष )रोशन घरत (सहखजिनदार )आणि विवेक कडू (सदस्य )यांनी खूप मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रमणीक म्हात्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे  संस्थापक  विकास कडू यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here