चूका दाखवूनही लोकांचे मिळणारे प्रेम हेच पत्रकारितेचे यश! कुणाल दराडे 

0

एसएनडी शिक्षण संकुलात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव

येवला प्रतिनिधी 

पत्रकारिता समाजाची सेवा करणारे कार्य आहे.म्हणूनच आजही पत्रकारितेचा मान सन्मान टिकून आहे. ग्रामीण भागातील पत्रकारिता संकटात, संघर्षातून सुरू आहे.वास्तव मांडून,चूका दाखवूनही लोक तुमच्यावर प्रेम करतात हेच पत्रकारितेचे यश आहे.समाजाला सुसंस्कृत व प्रबोधन करून दिशा देण्याचे काम पत्रकार करतात असे प्रतिपादन मातोश्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी कुणाल दराडे यांनी केले.

जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त बुधवारी (ता.११) बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकारांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला जगदंबा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.ज्येष्ठ पत्रकार राकेश गिरासे,तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण घुगे, सरचिटणीस अविनाश शिंदे,महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन देशमुख  आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.शहर व तालुक्यात कार्यरत असलेल्या विविध दैनिके,वाहिन्या तसेच स्थानिक वाहिन्यांच्या पत्रकारांचा यावेळी गौरव करण्यात आला.

जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेने तालुक्यात शैक्षणिक चळवळ उभी केली आहे.या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन नोकरी व रोजगाराच्या वाटा शोधत आहे किंबहुना कॅम्पस मुलाखतीतून एका वर्षात दोनशेहुन अधिक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने नोकरी मिळवून दिल्याची माहिती यावेळी रुपेश दराडे यांनी दिली.आरोग्य सेवेचे व्रत स्वीकारून अवघ्या सहा हजारांमध्ये महिलांची प्रसूती व अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती दराडे यांनी दिली. फक्त शाळा व बीए-बीएस्सीचे शिक्षण मिळणाऱ्या दुष्काळी येवल्यातील विद्यार्थ्यांना आता डॉक्टर,इंजिनियर होण्याची स्वप्नपूर्ती दराडे बंधूंनी पूर्ण केली आहे.शिक्षणाबरोबरच अनेकांच्या हाताला रोजगारही मिळाला असून आता तर अवघ्या काही रुपयात आरोग्य सेवाही मिळत असून येवल्याच्या प्रगतीत दराडे बंधूंचे योगदान मोठे असल्याचे यावेळी बोलताना माजी प्राचार्य दत्ता महाले,ज्येष्ठ शिक्षक शिवाजी भालेराव तसेच श्री.घुगे यांनी आपल्या भाषणातून सांगितले पत्रकारांच्या कार्याचा झालेला गौरव त्यांना प्रेरणादायी असल्याचे यावेळी घुगे म्हणाले.

गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या मातोश्री हॉस्पिटलची माहितीही यावेळी श्री.दराडे यांनी पत्रकारांना दिली.या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रविंद्र करमासे, माजी अध्यक्ष संतोष विंचू,जेष्ठ पत्रकार विलास पगारे,लाला कुडके,मनोज पटेल,कुमार गुजराथी,सुदर्शन खिल्लारे, विलास कांबळे,पांडुरंग शेळके,भीमा शिंदे,राजेंद्र परदेशी,बापूसाहेब वाघ,प्रमोद पाटील,संतोष घोडेराव,सुदाम गाडेकर, संतोष बटाव,दीपक सोनवणे,शबीर इनामदार,गोरख घुसळे,मुकुंद अहिरे, दीपक ढोकळे,भाऊराव वाळके,अनिल अलगट,गोकुळ वाघ,रोहन वावधने, अनुराग जोशी,हितेश दाभाडे,देवराम कदम,रामनाथ क्षीरसागर,अनिल जाधव,किरण ठाकरे,जयंत केंगे,भगवान रोठे,झाकीर शेख आदींचा यावेळी गौरव करण्यात आला.मातोश्री तंत्रनिकेतनचे प्राचार्य गितेश गुजराथी यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. संतोष विंचू यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here