पैठण,दिं.५: लाभक्षेत्र विकास प्राधिकरण ( कडा ) कार्यालयातील सहायक अधीक्षक अभियंता इंजि. जयसिंह नरसिंगराव हिरे पाटील हे पाटबंधारे विभागात ३९ वर्षांच्या सेवेनंतर ३१ डिसेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना कार्यालयातर्फे नुकताच निरोप समारंभ देण्यात आला . सहाय्यक अधीक्षक अभियंता जयसिंग हिरे हे सन १९ ८३ मध्ये जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंतापदी रुजू झाले.महाराष्ट्र सरकारच्या उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने आणि जलसंपदा विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्र सरकारने द्वितीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते .
कडाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला यावेळी कार्यकारी अभियंता अनिल निभोंरे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव,शाखा अभियंता प्रशांत देशपांडे,बालचंद अजमेरा, शेलार, विभागीय भांडारपाल निळकंठ पवार पाटील, नंदकिशोर ढाकणे, इरफान शेख सह यावेळी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता,शाखा अभियंता सह अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.