जासई हायस्कूल मध्ये शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न

0

उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज ,दहागाव विभाग जासई ता.उरण, जि.रायगड.या शैक्षणिक संकुलात 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री,कामगार नेते सुरेश पाटील हे लाभले होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिकविता – शिकविता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ देणारे व आपल्या जीवनात आदराचे स्थान असलेल्या आपल्या सर्व आदरणीय शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो .विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर  अरुण घाग यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या शिक्षक दिनाच्या दिवशी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते नववी अखेरच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करून स्वतः शिक्षकाची भूमिका अनुभवली. शिक्षक झालेल्या या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमा मध्ये आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही आजच्या शिक्षक झालेल्या विद्यार्थी – शिक्षका विषयी रंजक अनुभव कथन केले. विद्यालयाच्या उपप्राचार्या पाटील एस. एस, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख सर,उपक्रमशील विज्ञान शिक्षिका ठाकूर एस.ए.यांनीही मनोगत व्यक्त करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  घरत पी.जे.यांनी केले.तर इयत्ता दहावी क च्या वर्गशिक्षिका हुद्दार एन. एन.मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here