ठाकूर बुवाच्या यात्रेनिमित्त माहुर गडावर शेकडो दिंड्या दाखल: 

0
फोटो ओळी: माहूर गडावर ठाकूर बुवाच्या यात्रेनिमित्त शेकडो दिंड्या व पालख्या दाखल झाल्या आहेत. (छायाचित्र बालाजी कोंडे माहूर)

भगवान दत्तप्रभू च्या नावाने परिसर दुमदुमला
माहूर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व दत्तप्रभू चे पवित्र स्थान असलेल्या माहूरगडावर आज ठाकूरबुवाच्या यात्रेनिमित्त शेकडो दिंड्या,पालख्या दाखल झाल्या असून दत्त नामाचा गजर सर्वत्र दिसून येत आहे. शेकडो वर्षाची पायी चालत येण्याची परंपरा आजच्या आधुनिक युगात ही कायम आहे.
                              ठाकूर बुवाच्या यात्रेस एक वेगळी परंपरा लाभलेली आहे. या यात्रेत राज्यभरातून विविध जिल्ह्यातून शेकडो दिंड्या माहूर गडाकडे येतात. येणारे भाविक हे पायी चालत श्री दत्तप्रभू च्या दर्शनाकरिता येत असतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांकडून दत्तनामाचा गजर होत असल्याने अख्खा सह्याद्री पर्वत दत्तप्रभू च्या जय घोषाने दुमदुमला आहे.
                          माहूर शहरात अनेक महाराजांची खाजगी आश्रम, मठ आहेत. यात्रेस शेकडो वर्षाची परंपरा असल्याने अनेक दिंड्या शहरातील विविध आश्रम मठामध्ये थांबतात व त्याच ठिकाणी कीर्तन भजन करून श्री दत्तप्रभू च्या दर्शनाकरिता श्री दत्त मंदिरावर येतात त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर सर्वांचे समाधान होते. श्री दत्त शिखर संस्थान कडून येणाऱ्या दिंड्यांची दखल घेऊन त्यांचाही सन्मान करण्यात येतो. शहरातील व गडावर जाणाऱ्या रस्त्यावर जिकडेतिकडे पायी चालत जाणाऱ्या दिंड्या व पालख्या आज रोजी दिसून येत आहेत. सदरील दिंडी व पालख्यामधील भाविक हे प्रशासनाच्या कुठल्याही व्यवस्थेची मागणी करीत नाहीत जमेल तशी आपापल्या परीने व्यवस्था करून घेत असतात कुठेही गैरसोय झाली म्हणून तक्रार करीत नाहीत हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे. दोन दिवस सुरू असणाऱ्या या यात्रेत दिंड्या व पालखीच्या माध्यमातून हजारो भाविक दर्शनाकरिता गडावर येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here