डॉ. दिनकर पाटील यांचे निधन

0

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )

 उरण तालुक्यातील वशेणी गावचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. दिनकर बळीराम पाटील (८१)यांचे त्यांच्या राहत्या घरी वशेणी येथे  वृद्धपकाळाने निधन झाले असून, उरण तालुक्यातील  वशेणी गावासह पूर्व विभागाबरोबर केळवणे गावावरही मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.

विभागातील बहुतांशी धार्मिक आणि सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होणारे वशेणी गावचे भूमिपुत्र डॉ. दिनकर पाटील  हे १९६९ पासून उरण तालुक्याला लागून असलेल्या पनवेल तालुक्यातील केळवणे गावात वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. त्या प्रतिकूल परिस्थितीतीत अनेक  गरीब, गरजू रुग्णांची  निस्वार्थीपणे वैद्यकीय उपचाराची  सेवा केली आहे. त्यांच्या या अत्यावश्यक सेवेच्या कार्यामुळे त्यांना पितांबर स्वामी असे संबोधिले जात होते.

त्यानंतर त्यांनी वशेणी सारख्या रायगड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या वशेणी ग्रामपंचायतीचे सदस्य ते उपसरपंच पदावर काम केले आहे.कोरोना काळात कोरोना सारख्या महामारीला न घाबरता गावोगावी पोहोचून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचेही कार्य निर्भीडपणे पार पडले असून, अनेकांना दिवदान दिले आहे.या शिवाय ते जन्मापासून शाखाहारी असल्याने मागील ३५ वर्षांपासून ब्राम्हण म्हणून लग्न, पूजेसह विविध प्रकारची धार्मिक कार्ये करीत होते.

विभागात आपल्या कार्याचा ठसा उमठविणारे डॉ. दिनकर पाटील यांच्या अंत्यत्रेसाठी वशेणी येथे त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक व  हितचिंतकांनी मोठी गर्दी केली. होती.त्यांच्या पच्छात त्यांचे तीन मुलगे व तीन मुली नातवंडे असा त्यांचा परिवार असून, त्यांचा दशक्रिया विधी २९ नोव्हेंबर रोजी वशेणी खाडी येथे तर उत्तकार्य १ डिसेंबर २०२३  रोजी राहत्या घरी वशेणी येथे करण्यात येणार असल्याचे त्यांची मुलगी माजी उरण पंचायत समिती सदस्या दुर्गा म्हात्रे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here