डॉ. हनुमंतराव जगताप यांना राष्ट्रीय पुरस्कार

0

उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण जिल्हा रायगड येथील प्रा. डॉ. हनुमंतराव जगताप यांना राष्ट्रस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री नयना आपटे व अभिनेत्री साक्षी नाईक यांच्या हस्ते त्यांना नवी मुंबई येथे  सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि सुवर्णपदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड नवी मुंबई यांनी डॉ. हनुमंतराव जगताप यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. हनुमंतराव जगताप हे उरण नवी मुंबईतील कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे  योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे डॉ. जगताप यांचे कार्य पर्यावरण,  कृषी, वन विभाग आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य आहे, यामुळेच सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे.

यावेळी सहाय्य पोलीस निरीक्षक रत्ना खंडेलवाल, अँटी पायरसी सेलचे रामजीत गुप्ता, नगरसेविका गोवारी, संस्था अध्यक्ष मेघा महाजन यांची प्रामुख्याने उपस्थित होती. सदर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम जी लोणे, ज्येष्ठ प्रा. व्ही एस इंदुलकर  सर, दर्जा सुधार समिती अध्यक्ष डॉ. अरुण चव्हाण, एन एस एस  कार्यक्रम अधिकारी डॉ. डी पी हिंगमिरे, जिल्हा  सांस्कृतिक प्रमुख डॉ. पराग कारुळकर, प्रा. आनंद गायकवाड प्रा. अनुपमा कांबळे प्रा. ठवरे सर, प्रा. हन्नत  शेख, प्रा. विनिता तांडेल, प्रा. पूजा गुप्ता, प्रशासकीय प्रमुख तानाजी घ्यार, नयना साखरे, साईनाथ कदम आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here