दिघोडे येथील नविन प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन

0

उरण दि. 11(विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यात पूर्व विभागात लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे. मात्र कोप्रोली येथील आरोग्य केंद्रावर याचा खूप मोठा ताण पडत होता. शिवाय उरण पूर्व विभागातील रानसई, जांभूळपाडा, कंठवली, चिरनेर, वेश्वी दिघोडे गाव व दिघोडे गावच्या आजूबाजूच्या परिसरीतील नागरिकांना, आदिवासी बांधवांना आजारपणात तसेच वैदयकीय शस्त्रक्रिया तसेच औषधोपचारासाठी कोप्रोली किंवा नवी मुंबई, पनवेल येथे जावे लागत होते.दिघोडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने दिघोडे ग्रामस्यांवर अशी वेळ आली होती. मात्र आता दिघोडे ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.

दिघोडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना होणारा त्रास, त्यांचे दुःख बघून माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी दिघोडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी सुरवातीपासूनच पाठपुरावा सुरू ठेवला.5 वर्षांपूर्वी ही जागा जिल्हा परिषदेने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी या जागेवर हरकत घेउन आपला अधिकार सांगितल्यामुळे हे काम थांबले होते. आता मात्र तहसीलदारांनी ही जागा शासनाची असल्याचा निर्णय दिल्यानंतर येथे आरोग्य केंद्राच्या हालचालींना वेग आला आहे.दिघोडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर व त्यांच्या पत्नी सध्याचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी रायगड जिल्हा परिषद अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग,पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री,आरोग्यमंत्री,मुख्यमंत्री आदि ठिकाणी त्यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.या कामी माजी मंत्री सुनील तटकरे,माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांचेही विशेष सहकार्य लाभले.माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर,जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर यांच्या प्रयत्नाला यश आले असून या प्राथमिक आरोग्य केंद्राचे, उदघाटन मंगळवार दि 10/1/2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी डॉ. राजाराम भोसले वैद्यकीय अधिकारी,वैजनाथ ठाकुर माजी जिल्हा परिषद सदस्य, डॉ. जयकर येलिस हार्ट फाउंडेशन उलवे,डॉ पांडुरंग बोकाटे समूदाय आरोग्य अधिकारी विंधणे,संतोष परदेशी उरण तालुका आरोग्य पर्यवेक्षक, शरद घाटगे  – आरोग्य पर्यवेक्षक कोप्रोली , अजय पाटील -आरोग्य पर्यवेक्षक,विजय देशमुख इंजिनिअर राजिप अलिबाग यांच्यासह विशाल पाटील , मयूर घरत, आकाश टकले,मयूर पाटील,अश्मक पाटील , रमेश पाटील, अश्विन पाटील , सुमीत म्हात्रे, राजकुमार म्हात्रे, अरुण ठाकूर, समीर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. राजाराम भोसले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सर्वसामान्य जनतेला दिघोडे गावातच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्याच्या मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांनी वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर  व शासकीय अधिकारी कर्मचा-यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here