द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाटन.

0

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे) : कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन’ या संघटने तर्फे खेळाडू , कलाकार,गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना,कौशल्यांना वाव देण्यासाठी,स्पर्धेतुन उतमोत्तम  गुणीजण खेळाडू, कलाकार तयार करण्याच्या अनुषंगाने मंगळवार  दि 20/12/2022 ते रविवार 25/12/2022 दरम्यान एन एम एस ई झेड मैदान, पेट्रोल पंपाजवळ, बोकडविरा चारफाटा, ता:उरण, जिल्हा-रायगड येथे जिल्हा स्तरीय 22 वा युवा महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उदघाटन दिनांक 20 डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात करण्यात आले. सदर  उदघाटन प्रसंगी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज अनिल मालुसरे, महावीर चक्राने सन्मानित  कृष्णा सोनावणे यांचे सुपुत्र उद्योजक रमेश सोनावणे, शिवमुद्रा प्रतिष्ठान चे प्रकाश कदम, महामुंबई चे संपादक मिलिंद खारपाटील, सुजय प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश सकपाळ, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली घरत, उरण तालुका शेकाप नेत्या सीमा घरत,  धीरज बुंदे, सोनाली बुंदे, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू आदी मान्यवर उपस्थित होते.माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

जन्माला येऊन, आपण ज्या समाजात राहतो त्यांच्यासाठी चांगले करायलाच हवे असेही ते म्हणाले.सुभेदारांचे वंशज या कार्यक्रमात आल्याने या उद्घाटन सोहळ्यास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असेही ते म्हणाले.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणवंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय खेळाडू, कलावंत, कलाकार तयार झाले आहेत. खेळाडू, कलाकार आदि स्पर्धकांसाठी एक उत्तम व्यासपीठ(प्लेटफॉर्म) मिळवून देण्याचे काम द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने केले आहे. दरवर्षी या स्पर्धेस या युवा महोत्सवाला सर्व राजकीय पक्षाचे नेते,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते,सिने अभिनेते आवर्जून भेट देत असतात. कोणताही भेदभाव न करता राजकीय पक्ष विरहित असा हा महोत्सव असल्याने दरवर्षी या युवा महोत्सवाला जनतेचाही उत्तम प्रतिसाद मिळतो.दरवर्षी होणाऱ्या युवा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व विविध 35 व्यक्तिंना द्रोणागिरीभूषण पुरस्काराने गौरविले . यंदा 20 ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान एन एम एस ई झेड मैदान, पेट्रोल पंपाजवळ, बोकडविरा चारफाटा तालुका उरण, जिल्हा रायगड येथे 22 व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये डान्स, आर्चरी स्पर्धा, एथलेटिक्स स्पर्धा, देशी खेळ, मैदानी खेळ आदि  वेगवेगळ्या स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे.139 क्रीडा प्रकारात 21 हजार स्पर्धकांनी भाग घेतला आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा जिल्हास्तरीय युवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.विशेष म्हणजे या रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला अनेक राजकीय, सामाजिक क्रीडा, कला  अभिनय क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे.अशी माहिती द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी दिली.यावेळी खेळाडूंना उरण तालुक्यात सुसज्ज असे मैदान नसल्याची खंत महादेव घरत यांनी बोलून दाखवली. व उरणच्या विकासासाठी एक सुसज्ज मैदान उपलब्ध व्हावे अशी मागणी यावेळी महादेव घरत यांनी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here