धर्मांतराच्या गैरसमजातून खोटे आरोप करून ख्रिस्ती धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न थांबवावा -अनिल भोसले

0

संगमनेर : सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहरात पास्टर संजय गेले, हे सेवा कार्य करीत असून काही दिवसापूर्वी एका दवाखान्यात औषधोपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णासाठी  प्रार्थना करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला गेला. प्रार्थनेला अंधश्रद्धेचे स्वरुप देण्याचा प्रयत्न आणि त्या गैरसमजातून त्यांच्यावर जादूटोणा व धर्मांतरणाचा खोटा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल भोसले यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. 

         सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये धर्मांतराच्या गैरसमजातून ख्रिस्ती समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते हे लक्षणीय आहे. यापुढे गैरसमजातून घडणाऱ्या घटना त्वरित  थांबवाव्यात, अशी मागणी भोसले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. वरील घटने संदर्भात आटपाडी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी घटनेची माहिती घेतली.भोसले म्हणाले की, देशामध्ये अल्पसंख्यांक समाजावर होत असलेले अत्याचार विशेषतः ख्रिस्ती मिशनऱ्यांनी देशाच्या विकास प्रवाहामध्ये शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील दिलेले योगदान याकडे दुर्लक्ष करून जाणून बुजून ख्रिस्ती समाजाला सतत लक्ष केले जात आहे.

  सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहरातही एका हॉस्पिटलमध्ये प्रार्थना करावयास गेलेले पास्टर जॉन गेले यांच्यावर जादूटोणा व धर्मांतरणाचा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये संबंधित नातेवाईकांनीही असे काही घडले नसल्याचे सांगितले. पोलिसांकडूनही याचे खंडन करण्यात आले. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही अतिशय गंभीर बाब आहे. जाणून बुजून आरोप करणे, अत्याचार करणे अशा घटनांमुळे ख्रिस्ती धर्म संपविण्याचा हा कट तर नाही ना ? अशी समाजभावना होत चालली आहे.तरी वरील सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यात येऊन खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संबंधितावर सत्य घटना तपासून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी अनिल भोसले यांनी आपल्या पत्रकाद्वारे केली आहे. ख्रिस्ती धर्म शांतताप्रिय आहे. म्हणून त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, प्रेम, दया, शांतीचा संदेश देणाऱ्या ख्रिस्ती समाजाला लक्ष करण्यात येऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा होत असलेला प्रयत्न त्वरित थांबवावा. अन्यथा यापुढे आम्ही शांत बसणार नाही. असेही भोसले यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here