नवरात्रौत्सव शांततेत साजरे करण्याचे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन.

0

उरण दि 11(विठ्ठल ममताबादे) : दिनांक 10/10/2023 रोजी 17ः10 ते 18ः00 वा.चे दरम्यान नवरात्रौत्सव- 2023 च्या अनुषंगाने उरण पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील व सागर रक्षक दल सदस्य यांची भोईर गार्डन, आनंदी हाॅटेल जवळ, उरण कोटनाका, याठिकाणी बैठक घेण्यात आली.  सदर बैठकीस उपस्थितांना उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांनी खालील  सुचना दिल्या. व सर्वांना नवरात्रौत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.

1) नवरात्र उत्सवाचे अनुषंगाने मा. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त परिपत्रका- प्रमाणे अटी व शर्तीचे वेळोवेळी पालन करणे.

2) दुर्गा मुर्ती मिरवणुक विहीत वेळेत संपवावी. 

3) विसर्जन मिरवणुकीतील देखावा अगर सजावट टेलीफोन व विदयुत तारांना अडथळा निर्माण होईल इतका उंच ठेवू नये. 

4) विसर्जन मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने सुस्थितीत असल्याबाबत आर.टी.ओ. विभागाकडून  दाखला घ्यावा. वाहनाचा नंबर, चालकाचे नाव, पत्ता व संपर्क क्रंमाक याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात कळवावी. प्रत्येक वाहनांमध्ये आवश्यकता पडल्यास मंडळाचा स्वतःचा दोर वाहन ओढण्यासाठी ठेवावा. 

5) विसर्जन मिरवणुकीचे वेळी दोन मंडळांमध्ये जास्त अंतर पडू देऊ नये, योग्य अंतर ठेवावे.

6) दुर्गा मूर्तीचे विसर्जन वेळी लहान मुलांना व पोहता न येणा-या मंडळाचे सदस्यांना पाण्याच्या आतमध्ये जाऊ देऊ नये. 

7) दुर्गा मुर्ती विसर्जन मिरवणुकी काळात गुलालाचा वापर करण्यात येवू नये. 

8) मिरवणुकीत कुठलेही धोकादायक खेळ तसेच शस्त्राचे खेळ करू नयेत. 

9) मिरवणुकीत दोन पेक्षा जास्त वाहने  ( 1 देखाव्यासाठी व 1 जनरेटरसाठी) सामील करू नये. 

10) मिरवणुकीचे वेळी प्रखर विदयुत झोताचा वापर करू नये. 

11) विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे सभासदा व्यतिरीक्त बाहेरच्या लोकांना सामील होवू देऊ नये.

12) मिरवणूक सामील झालेल्या लोकांनी स्वतः बरोबर लाठया, काठया, शस्त्राचे, दगड धोंडे, स्फोटक पदार्थ, नशिले पदार्थ जवळ बाळगु नयेत किंवा त्याचा वापर करू नये.

13) सार्वजनिक दुर्गा मुर्तीचे सजावट करताना आक्षेपार्ह बॅनर, पोस्टर, चित्रफित, चलचित्र देखावा नसावा. 

14) सार्वजनिक दुर्गा मुर्तीचे विसर्जन मिरवणुकीत देवाधर्माची भावगिते अशा प्रकारची गाणी लावण्यात यावी. अश्लील गाणे लावण्यात येऊ नये. 

15) ध्वनी प्रदूषण कायदयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादा ओलांडू नये. तसे केल्यास मंडळाविरूध्द कठोर कायदेशिर करण्यात येईल. 

16) सार्वजनिक दुर्गा मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकी वेळी डी.जे. लावण्यात येवू नये. 

17) उरण शहरात व गावात लोक सहभागातून जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.

18) जासई, दिघोडे व चिरनेर या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्याबाबत उपस्थितांना माहिती देवून आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही  

19)  सध्याची राजकिय परिस्थितीच्या अनुषंगाने गावातील विषेश घटना व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस ठाणेत माहिती देणे.

20) समुद्र किनारी/खाडी किनारी असलेल्या गावातील ग्रामस्थांनी समुद्र किनारी व खाडी मध्ये संशयित बोट, वस्तु अथवा इसम दिसून आल्यास तात्काळ डायल क्रं. 1093 व 112 वर संपर्क करावे.

 वरील प्रमाणे पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना, मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना,उपस्थितांना सुचना देण्यात आल्या असून त्यांच्या अडचणीबाबत विचारणा करून शंकांचे निरसन करण्यात आले आहे.  सदर बैठकीसाठी हद्दीतील सार्वजनिक    नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील व सागर रक्षक दल सदस्य उपस्थित होते. सदर बैठक शांततेत पार पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here