नागेंद्र म्हात्रे यांचा स्वईच्छेने राजिनामा.

0

उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )

न्हावा शेवा सिएचए संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी गेली चार वर्ष उत्तम कामगिरी करत  कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार न करता संघटना मजबूत करण्यासाठी सिएचए आधार चषक आयोजन करून आणि नियमावली बनवून आपले उत्तम योगदान संघटनेला दिले आहे. परंतु सलग चार वर्ष बिनविरोध निवड झाल्या नंतर मात्र यंदाच्या नवीन वर्षात त्यांनी स्वइच्छेने राजिनामा दिला आहे. नवीन चेहऱ्यांना, नवीन सदस्यांना न्हावा शेवा सीएचए संघटनेचे अध्यक्ष पद मिळाले पाहिजे या हेतूने तसेच सर्वांना समान संधी व समान न्याय मिळाले पाहिजे या हेतूने आपण अध्यक्ष  पदाचा राजीनामा दिला असल्याचे उरण मधील सामाजिक कार्यकर्ते तथा न्हावा शेवा सिएचए संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here