उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पागोटे तालुका उरण जिल्हा रायगड येथे ग्रंथालयाची स्थापना मागील वर्षी करण्यात आली होती. या ग्रंथालयासाठी महाविद्यालयाच्या वतीने रुपये ३४१९३ किमतीची पुस्तके भेट देण्यात आली.ग्रामीण भागात ग्रंथालय स्थापना व वाचन विकास चळवळ वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
कार्यक्रमासाठी गावचे सरपंच कुणाल पाटील,रायगड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनंत पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम.जी.लोणे, आय.क्यु ए.सी समन्वय डॉ.ए.आर. चव्हाण,प्रा व्ही.एस. इंदुलकर, डॉ. एच. के जगताप, प्रा.ए.के. ए.के. गायकवाड, प्रा. रामकृष्ण ठावरे, डॉ. पराग कारुळकर,तानाजी घ्यार, महाविद्यालयातील विद्यार्थी, शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. या उपक्रमासाठी हितेंद्र घरत (सामाजिक कार्यकर्ते केगाव) यांनी रुपये ५००० तसेच के.ए.शामा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आर्थिक मदत केली.त्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाले. डॉ. एम.जी.लोणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे प्रबोधन व अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते असे सांगितले.
कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.व्हि. एस. इंदुलकर यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या समोर मांडले.व वाचनाची आवड विद्यार्थ्यांनी निर्माण करावी असे सांगितले. डॉ. ए.आर.चव्हाण यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाचे उदाहरण दिले व पराक्रम व बुद्धिमत्ता यांचे एकत्रीकरण झाले पाहिजे असे सांगितले. त्यासाठी वाचन आवश्यक असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते पुस्तके सरपंच कुणाल पाटील व मुख्याध्यापक अनंत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विनिता तांडेल, कु.योगिनी म्हात्रे यांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.