पिंपळगांव बसवंत उपविभागाचे वरीष्ठ तंत्रज्ञ आनंदा बाळासाहेब गांगुर्डे गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार प्रदान

0

पिंपळगांव बसवंत (प्रतिनिधी)

        महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनी मर्यादित नाशिक परिमंडळ,नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२२-२३ वर्षाचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार पिंपळगांव बसवंत उपविभागाचे वरीष्ठ तंत्रज्ञ आनंदा बाळासाहेब गांगुर्डे (पालखेड कक्ष) यांना आज कामगार दिनाचे औचित्य साधून नाशिक विभाग विधुत मंडळाचे मुख्य अभियंता दिपक अ.कुमठेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

    नाशिक येथे कामगार दिन व महाराष्ट्र दिनी आनंदा गांगुर्डे यांना सन्मानित करण्यात आले.  पुरस्कार मिळाल्याबद्दल माननीय दीपकजी कुमटेकर (मुख्य अभियंता नाशिक परिमंडळ),ज्ञानदेवजी पडळकर (अधीक्षक अभियंता नाशिक मंडळ),रवींद्रजी आव्हाड (कार्यकारी अभियंता चांदवड विभाग) एकनाथजी कापसे (उपकार्यकारी अभियंता पिंपळगाव उपविभाग),अध्यापकभारती व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा.शरद शेजवळ, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकवाड,नितीन अ.गांगुर्डे, गणेश गांगुर्डे,दिलीप गांगुर्डे,योगेश गांगुर्डे,दिलीप बनकर यांनी आनंदा गांगुर्डे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here