पैठण येथे साई बाबा मंदिर चतुर्थ वर्धापन उत्साहात संपन्न.

0

पैठण,दिं.२५: पैठण येथील श्री साईबाबा मंदिर चतुर्थ वर्धापन दिन निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

                  पैठण शहरामधील रामनगर येथील श्री साईबाबा मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनाच्या निमित्ताने  साई चरित्र पारायण, किर्तन,भारूड, व पालखी मिरवणूक व महाप्रसाद आदी कार्यक्रम अतिशय उत्साहात शिस्तीत संपन्न झाले . 

        याप्रसंगी  साई चरित्र पारायण सोहळा संपन्न झाला त्यास मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते. या समवेत बालकिर्तनकार ह.भ.प.सोनाली ताई सागडे,ह.भ.प.वैष्णवीताई जाधव,ह.भ.प.संदिप महाराज सोलनकर,यांचे भारुड संपन्न झाले.

  श्री साईबाबांचा अभिषेक ,आरती व ग्रंथपूजन झाले नंतर ह.भ.प.रामेश्वर भाकड शास्री यांच्या काल्याच्या  कीर्तनाने  कार्यक्रमाची सांगता झाली.भव्य मिरवणूक पैठण शहरात काढण्यात आली. रामनगर-यशवंतनगर- इंदिरानगर-अन्नपूर्णानगर-भवानीनगर-नाथ हायस्कुल-छत्रपती शिवाजी महाराज चौक-मेनरोड-कोर्ट रोड-यशवंतनगर-बालाजी विहार-रामनगर या मार्गे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.मिरवणूक व कीर्तनास मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.

        वै.ह .भ.प.रामभाऊ सानप यांच्या आशीर्वादाने, ह.भ.प. विष्णु महाराज गायकवाड ,ह.भप.श्रीकांत दिलवाले यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परीषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास बापु भुमरे,  माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे,माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे, डॉ. सुनिल शिंदे , मा.नगरसेवक बाळासाहेब माने,बंडु आंधळे नगरसेवक भुषण कावसानकर,विजय ठाणगे,मिलींद घोडके,असलम पठाण, कल्याण मगरे, पत्रकार गजानन पाटील आवारे,अनिकेत वैद्य,बाबासाहेब मुळे,गणेश माळवे,दिपक मोतीयाणी,अशोक सोनटक्के,मिठ्ठू कारके,बंटी,सोमनाथ गवांदे,मनोहर नवले,शरद थोटे,सुरेश कौले ,सुर्यकांत धुपे, ऍड.विजय मुळे,बबन शिंदे,संजय गुलालकर, ऍड संदीप जाधव ,राधेश्याम पाणगे ,  गणेश माळवे , देवेंद्र खंडेलवाल ,भास्कर कुलकर्णी,सदाशिव उगले,संदिप धोकटे,राजू हजारे, कल्याण सोनवणे,विजय बोबडे,चंद्रकांत झारगड,सुधीर आनंदकर,गणेश थोटे आदींनी विशेष योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here