वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या करिता स्वःतंत्र शेड्युल नुसार सुधारित वेतन दर लागु करावेत
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी.
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्यात कामगारांच्या करिता 65 पेक्षा जास्त विविध शेड्युल नुसार किमान वेतन दर निश्चीत केले जातात. या मध्ये दर पाच वर्षांनी तत्कालीन महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती,ई आधारावर किमान वेतन दर मध्ये सुधारणा करावेत असा किमान वेतन कायद्यानुसार लागु करणे बंधनकारक आहे. पण महाराष्ट्रातील 15 ऊद्योगातील किमान वेतन दर मुदत संपुनही 7/8 वर्ष सुधारित वेतन दर अद्याप पर्यंत लागु केले नाहीत. त्यामुळे विविध शेड्युल उद्योगातील हजारो कामगार सुधारित वेतन दरा पासून वंचित आहेत. शासनाने किमान वेतन सुधारणा वेळेवर न झाल्याने कामगारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होते. सध्या मिळणारे उत्पन्नात किमान गरजाही पुर्ण करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे प्रलंबित सुधारित वेतन दर फरका सहित देण्यासाठी मागणी ठेकेदार कामगार संघ , महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने महाराष्ट्रातील लाखो कंत्राटी कामगारांच्या वतीने मा. कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य सतीश देशमुख यांना संघटनेच्या पदाधिकारी यांनी कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा मुंबई येथे देवून कामगारांच्या विविध व्यथा मांडून दिलेली आहे.
त्यांच प्रमाणे वीज ऊद्योगातील कंपनी मध्ये सुमारे 40 हजार पेक्षा जास्त कामगार कंत्राटी पध्दतीने कायम कामगारांच्या समावेत कार्यरत आहेत . महानिर्मीती मधील कंत्राटी कामगारांना फॅक्टरी अंडर फँक्टरी अँक्ट 1947 नुसार व महापारेपण कंपनी व महावितरण मधील कंत्राटी कामगारांना शाॅप अँक्टनुसार किमान वेतन दिले जाते आहे. विद्युत क्षेत्रातील कामगारांना करावी लागणारी कामे, धोक्याची शक्यता, काम करताना लागणारे विशेष ज्ञान, कुशलता, कौशल्य, अपघाताचे प्रमाण,उच्च विद्युत भार, धोकादायक ऊद्योग असल्यामुळे या कामगारांना स्वतंत्र शेड्युल नुसार विद्युत ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्यां करिता शेड्युल् निर्माण करून कामगारांना त्यानुसार सुधारित वेतन दर, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, धोकादायक ऊद्योगातील भत्ता नुसार किमान वेतन दर निश्चीत करून कामगारांना लाभ देण्यात यावेत. व सध्या चालू असलेल्या किमान वेतन अधिसूचना दरांची मुदत संपण्यापुर्वी घोषणा करावी तसेच या विषयावर सविस्तर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा आयोजित करावी अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या व ठेकेदार कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने सतीश देशमुख कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना निवेदना व्दारे दिली आहे. या वेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार उपमहामंत्री राहूल बोडके व कोषाध्यक्ष सागर पवार उपस्थित होते.