प्राणी संरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा: निमा अरोरा यांचे

0

अकोला :  मानसाप्रमाणे प्राणीदेखील आपल्या समाजाचा आणि कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असून त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. याकरीता नागरिक व प्राणीमित्रांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. 

     प्राण्यांवर होत असलेला अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात प्राणीमित्र कार्यकर्ता व प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीव्दारे प्राणी संरक्षण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, प्राण्यांवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असून याकरीता प्राणीमित्रांनी पुढाकार घ्यावा. अपघात व इतर कारणास्तव जखमी अवस्थेत असलेल्या जनावरांना तातडीने उपचार करावा. याकरीता प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी कार्यरत असून अशा प्राण्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.  

जनजागृती रॅलीची सुरुवात आज सकाळी नऊ वाजता झाली. यामध्ये स्वयंसेवी संस्था, प्राणीमित्र व न्यु इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठया संख्येने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदिश बुकतारे, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. तुषार बावने, प्रादेशिक परिवहन विभागाचे विलास पाटील, प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे राखी वर्मा, भूषण पिंपलकर, स्वयंसेवी संस्थाचे अधिकारी, कर्मचारी व प्राणीमित्र आदि उपस्थित होते. 

ही रॅली प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, आरएलटी कॉलेजपासून सुरु होवून बस स्टॅण्ड, टॉवर चौक, मो.अली चौक, गांधी रोड मार्गे प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी सेंटर येथे समारोप झाला. या रॅलीत पशुपक्षी व प्राण्याचे हक्क, अधिकार व संरक्षण संदर्भात विविध संदेशाचे जनजागृतीपर घोषणा व बॅनरव्दारे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here