सातारा दि. 9 : फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इ. 8 वी ते 10 वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. मोफत भोजन, निवास, नाष्टा, दूध, फळे, अंडी, बेडिंग साहित्य तसेच शैक्षणिक साहित्य पुरविली जातात. तसेच प्रवेशितांना दरमहा रु. 500/- निर्वाहभत्ता दिला जातो.
इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व ज्यांचे वार्षिक उत्पन रुपये दोन लाख (अनुसूचित जाती जमातीसाठी) व रुपये एक लाख (वि.जा.भ.ज., विमाप्र, इमाव साठी) पेक्षा कमी आहे अशा सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व जाती संवर्गाच्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.
तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनाथ व दिव्यांग संवर्गातील वरील अटींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, फलटण (जाधववाडी) येथे संपर्क साधावा.