माहूर:- शहरात राष्ट्रीय राज्य मार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून या कामासाठी एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आला आहे, दुसऱ्या बाजूला वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने फुटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण दोन दिवसा पूर्वी काढण्यात आले.मात्र महामार्गाच्या लगत सुरू असलेले नाली बांधकाम सबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे कासव गतीने सुरू असल्याने वाहतुकीच्या अडथळ्याला मुख्य कारण आहे.परिणामी या मार्गावर धुळी चे साम्राज्य पसरले आहे.
राष्ट्रीय राज्य मार्ग क्रमांक १६१ ए चे काम प्रगती पथकावर आहे.या रस्त्याच्या कामासोबत नाली चे ही बांधकाम सुरू आहे.मात्र नाली बांधकाम अनेक ठिकाणी अर्धवट सोडून पुढील काम करण्यात आल्याने या मार्गावर वेळोवेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होते.हे काम एकासोईने पूर्ण करण्यात आले तर नाली वरील फुटफाट वर लघु व्यावसायिक आपले उदरनिर्वाह करू शकतील व रस्त्यालगत चे ठेले ही कमी होतील.मात्र सध्या एका बाजूने रस्त्याचे काम सुरू असल्याने त्या बाजूने वाहतूक बंद असून दुसऱ्या बाजूने सुरू असलेल्या वाहतुकीचा वेळोवेळी खोडांबा होत असल्याने नाली किमान नाली बांधकाम तरी वेगाने पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.