सातारा : देश – विदेशात कोणत्याही प्रकारच्या घडामोडीत बहुजनांवर अन्याय झाला तर फक्त आणि फक्त खरा-खुरा बाबासाहेब यांचेच अनुयायी सामोरे जात असतात. असे परखड मत रमेश इंजे यांनी व्यक्त केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वास्तव परिस्थितीवर चर्चा-विनिमय करण्यात आला.तेव्हा महामानव यांच्याबद्धल अपशब्द बोलणाऱ्या प्रवृतींचा जाहीर निषेध करण्यात आला.तेव्हा इंजे मार्गदर्शन करीत होते.
छ. शिवराय, डॉ.आंबेडकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,म. फुले,कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांबद्धल वेळोवेळी अपशब्द राज्यपालपासून मंत्री, आमदार आदी वापरत असून अकलेचे तारे तोडत आहेत. त्यावर त्यांचेच लोकप्रतिनिधी त्यांचीच री ओढत आहेत.तेव्हा बहुजनांनी एक होणे काळाची गरज आहे.फक्त महापुरुष यांची नावे घेऊन पोळी भाजण्याचे काम करण्यासाठी संकुचित विचार करणाऱ्याना आता तरी थांबवले पाहिजे. याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.बहुजनांत काहीही घडले तरी फक्त एक विशिष्ट समाजच पुढे असतो.तर इतर नेत्यांनीही आपापल्या समाजात जागृती करून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचा पिंपरी चिंचवड दौ-या दरम्यान घडलेल्या घटनेबाबतही चर्चा करण्यात आली. पिपरी चिंचवड येथे मोरेश्वर शेडगे (माजी नगरसेवक) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवुन ते श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा येथील कार्यक्रमास मोरेश्वर शेडगे यांचे निवासस्थानातून निघाले असताना अचानकपणे समोरुन एक अनोळखी इसम जोरात पळत आला व ना.पाटील यांच्या चेह-यावर काळया रंगाचे द्रव्य/शाई फेकली.तदनंतर इसमाला व त्याचे इतर साथीदारांना लागलीच पोलीसांनी जागेवरच ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली. त्यांची मनोज भास्कर घरवडे ( वय ३४ रा. गोकुळ हॉटल जवळ पिंपरी समता सैनिक दल – संघटक ), धनंजय भाऊसाहेब इजगज वय २९ वर्षे रा. आनंदनगर चिचवड पुणे,समता सैनिक दल सदस्य) व विजय धर्मा ओव्हळ वय ४० वर्षे रा. आनंदनगर चिंचवड, पुणे वंचित बहुजन आघाडी सचिव) असे असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. अशा घोषणा दिल्या. याबाबत चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिन ५५३/२०२२ भादवि कलम ३०७, ३५३ २९४ ५००, ५०१ १२० (३) ३४ क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करून अधिक तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खराडे हे करीत आहेत.तेव्हा फक्त शाई टाकली म्हणून एवढी आर्टिकल लावण्याची आवश्यकता नाही. याबाबतही चर्चा करण्यात आली.एका पत्रकारासह ११ पोलीस निलंबित केलेले आहेत.त्यावर ना.पाटील म्हणतात,पोलिसांवर कठोर कारवाई न करता बदली वैगरे गृहमंत्री करतील.हे कशाचे द्योतक आहे.
सदरच्या चर्चेत रिपब्लिकन सेनेचे पश्चिम अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने, नंदकुमार काळे,गणेश भिसे, दिलीप फणसे,रामचंद्र गायकवाड, अनिल वीर, अशोक भोसले,तुकाराम गायकवाड, शाहिर प्रकाश फरांदे,श्रीरंग रणदिवे व यशवंत भाले,नवनाथ लोंढे,महादेव मोरे, दिलीप सावंत, भाऊ धाइंजे, खरात आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी,मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भन्ते दिंपकर यांच्या अधिपत्याखाली वंदना घेण्यात आली.समारोपप्रसंगी आरपीआय तालुकाध्यक्ष आप्पा तुपे व विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड,पदाधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.संतोष मोरे यांनी आभार मानले.