येवला( प्रतिनिधी)
येवला तालुका व लासलगाव,विंचूर, देवगाव परिसरात ठीक- ठिकाणी मोफत इ -श्रम कार्ड नोंदणी व कार्ड मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम भाजप नेते बाबासाहेब डमाळे पाटील यांच्या मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे त्याची सुरुवात अंदरसुल येथून करण्यात आली.
शासनाच्या विविध योजनांसाठी भविष्यात उपयुक्त ठरणाऱ्या इ-श्रम कार्डाची प्रत्येक नागरिकाला आवश्यकता भासणार असून ,या कार्डाचे महत्त्व समजले जावे हा या कॅम्प मागचा हेतू असल्याचे बाबासाहेब डमाळे पाटील यांनी सांगितले.
येवला तालुक्यासह लासलगाव,विंचूर, देवगाव परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी हे मोफत इ-श्रम कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे. तत्पूर्ती सोशल मीडिया, वृत्तपत्र व पत्रका द्वारे त्या त्या गावांना सदरची माहिती देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पहिला कॅम्प अंदरसुल येथे संपन्न झाला. यावेळी अनेक महिला-पुरुष मोठ्या संख्येने हजर होते व त्यांनी सहभाग नोंदवून फायदा घेतला. सदरचा कॅम्प बाबासाहेब डमाळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुलोमचे जिल्हा संयोजक संतोष चव्हाण, तालुका संयोजक जयप्रकाश वाघ, विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष वृशाल डमाळे हे आयोजन करत आहे.